शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, विजेचा प्रश्न निकाली काढू : संजय पाटील

By admin | Updated: January 6, 2015 00:57 IST

ते म्हणाले की, दुष्काळी तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न, वीज, बेरोजगारी आदी प्रश्नही महत्त्वाचे आहेत.

कवठेमहांकाळ : जिल्ह्यातील जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ करुन दाखवू तसेच पाणी, वीज, बेरोजगार आदी प्रश्न निकालात काढण्यासाठी आपण सर्व ताकद पणाला लावू, अशी ग्वाही खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.खासदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कवठेमहांकाळ येथे जतचे आमदार विलासराव जगताप आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले की, दुष्काळी तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न, वीज, बेरोजगारी आदी प्रश्नही महत्त्वाचे आहेत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत तसेच अजितराव घोरपडे यांनी शेतीच्या पाण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यात या महिन्यात जलसंपदामंत्री गिरीश बापट यांना बोलाविण्यात येणार आहे. आमदार जगताप म्हणाले की, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी या दुष्काळी तालुक्यांनी संजयकाका यांना मोठे मताधिक्य दिले आहे. त्यामुळे या भागाचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत.घोरपडे म्हणाले की, खा. पाटील यांनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संपूर्ण ताकद लावावी, आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम आहोत. यावेळी संजीव सावंत, मिलिंद कोरे, अनिल लोंढे, दयानंद सगरे, तानाजी यमगर, सुनील पाटील, अवधूत पवार, ओंकार पाटील, उदयराजे भोसले, डॉ. शिवपुत्र कोरे उपस्थित होते. सावळज : खा. संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तासगाव तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. तासगावात खा. पाटील यांनी शुभेच्छा स्वीकारून विविध उपक्रमांचे उद्घाटन केले.सहाय्यक विभागीय आयुक्त इंद्रजित देशमुख, तहसीलदार राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी हेमंत निकम, अनिकेत भारती, रमेश बनकर, मनोज देसाई, महादेवराव हिंगमिरे, सतीश नलवडे, शिवाजीराव पाटील, अविनाश पाटील, अमित पाटील, दिलीप देसाई, निलेश दीक्षित, प्रकाश माळी, प्रशांत पाटील, अभिजित शिरोटे, गुणवंत पाटील, बाहुबली शिरोटे, अमोल काटकर, जयवंत माळी, संजय साळुंखे, सुनील जाधव, तानाजी लांडगे, प्रदीप माने, हणमंत पाटील, रामदास खताळ, विनायक पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)