शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर नगरपालिकेत संजय कोरे अस्वस्थ

By admin | Updated: September 5, 2014 00:18 IST

संघर्ष चव्हाट्यावर : पक्षप्रतोद, नगराध्यक्षांच्या कुरघोड्यांचा परिणाम

अशोक पाटील --इस्लामपूर,, एम. डी. पवार यांची सत्ता उलथवून टाकल्यापासून इस्लामपूर नगरपालिकेवर उरुण परिसरातील पाटलांचे वर्चस्व आहे. नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोणीही असो, कारभार मात्र पाटील मंडळीच करीत असतात. पालिकेच्या सभागृहात आणि कारभारात वचक ठेवून राजकीय खेळी करण्यात हातखंडा असलेले पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचे समर्थक सुभाष सूर्यवंशी सध्या नगराध्यक्षपदावर आहेत, तर एन. ए. गु्रपचे संजय कोरे उपनगराध्यक्ष आहेत. परंतु कोरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांतीलच काही मंडळी कुरघोड्या करत असल्याने ते सध्या अस्वस्थ आहेत. पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असल्यापासून जे नगराध्यक्ष झाले, त्यातील बहुतांशी नगराध्यक्षांचा कारभार विजयभाऊ पाटील यांनीच पाहिला आहे. सध्याही अशीच परिस्थिती आहे. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचे मार्गदर्शन असले, तरी पक्षप्रतोद हेच प्रशासनातील निर्णय घेत असतात. काहीवेळा संघर्षही चव्हाट्यावर आले आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष महादेव कोरे, शिवाप्पा सांभारे, वाय. एस. जाधव, मुनीर पटवेकर, सुधीर पिसे, सौ. शारदा पाटील या नगराध्यक्षांवेळी राष्ट्रवादीतीलच काहींनी अडथळे निर्माण केले होते, तर अशोकदादा पाटील, आनंदराव मलगुंडे, पै. भगवान पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, सौ. अरुणादेवी पाटील या नगराध्यक्षांना मात्र पक्षप्रतोद विजयभाऊ गटाने सहकार्याची भूमिका घेतली होती.नगराध्यक्ष सूर्यवंशी हे विजयभाऊ पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. उपनगराध्यक्ष पदही विजयभाऊ गटाला हवे होते. परंतु एन. ए. गु्रपने आक्रमक भूमिका घेऊन संजय कोरे यांना उपनगराध्यक्षपद मिळवून दिले. हे पद मिळाल्यापासून कोरे नगराध्यक्ष दालनात अनेकवेळा अनुपस्थित असल्याचे दिसत आहे. पालिकेतील काही सभांनाही त्यांची उपस्थिती नव्हती. दैनंदिन कारभारात विजयभाऊ पाटील आणि नगराध्यक्ष सूर्यवंशी यांच्या कुरघोड्यांमुळे ते अस्वस्थ असल्याचे दिसत आहेत.कोरेंची सभांना दांडीएन. ए. गु्रपने आक्रमक भूमिका घेऊन संजय कोरे यांना उपनगराध्यक्षपद मिळवून दिले. हे पद मिळाल्यापासून कोरे नगराध्यक्ष दालनात अनेकवेळा अनुपस्थित असल्याचे दिसत आहे. पालिकेतील काही सभांनाही त्यांची उपस्थिती नव्हती.कार्यक्रमपत्रिकेतून नाव वगळलेइस्लामपूर पालिकेच्यावतीने दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उपनगराध्यक्ष व शिक्षण सभापती या नात्याने संजय कोरे यांचे नाव असणे गरजेचे होते; परंतु या पत्रिकेत कोरे यांच्या नावाला बगल देण्यात आली आहे. यावरूनच कोरे यांच्याविरोधात कुरघोड्याचे राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे.४कोरे पहिल्यापासूनच सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराज आहेत. त्यांनी यापूर्वी राजीनामाही दिला होता. शहरातील विकासकामे निकृष्ट दर्जाची आहेत. पालिकेत ठेकेदारांची मक्तेदारी असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे कोरे नाराज असल्याने ते खुर्चीपासून दूरच राहणे पसंत करत आहेत.