शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

संग्राम कदमची आत्महत्या आर्थिक कारणातूनच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:26 IST

इस्लामपूर : शहरातील जुनी भाजी मंडई परिसरातील अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहणाऱ्या ३१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी ...

इस्लामपूर : शहरातील जुनी भाजी मंडई परिसरातील अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहणाऱ्या ३१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये पैशासाठी तगादा लावणाऱ्या ८ ते १० जणांचे बोलणे हाती लागल्याचे समजते. मात्र मृताच्या कुटुंबीयांकडून अद्याप रितसर फिर्याद दाखल न झाल्याने पोलीस या घटनेची प्राथमिक चौकशी करत आहेत.

संग्राम वसंतराव कदम (वय ३१, रा. कापूसखेड नाका, इस्लामपूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो एका गॅरेजमध्ये काम करत होता. दुचाकी गाड्यांची साखळी पद्धतीने विक्री करण्याच्या व्यवसायात त्याच्याकडे अनेकजणांनी पैशाची गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. या व्यवहारात संग्राम कदम पुरता गुरफटून गेला होता. बऱ्याचजणांनी पैशासाठी त्याच्याकडे तगादाही लावला होता. शेवटी हा त्रास असह्य झाल्याने त्याने आत्महत्या केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संग्रामच्या पत्नीने पतीच्या आत्महत्येच्या घटनेची वर्दी देतानाच या मृत्यूची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

फोटोे - १२०२२०२१-आयएसएलएम- संग्राम कदम