शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत संभाजी पवार गटाला खिंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील माजी आमदार संभाजी पवार गटाला खिंडार पाडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले. पवार समर्थक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील माजी आमदार संभाजी पवार गटाला खिंडार पाडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले. पवार समर्थक माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळी, संतोष देवळेकर व हेमंत खंडागळे यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवार गटासोबतच खा. संजयकाका पाटील यांच्या गटालाही राष्ट्रवादीने दणका दिला आहे.

शहरात माजी आमदार संभाजी पवार यांचा स्वतंत्र गट कार्यरत आहे. सध्या पवार हे भाजपमध्ये असले, तरी त्यांच्या गटाचे अस्तित्व आजही कायम आहे. कधीकाळी पालकमंत्री जयंत पाटील व संभाजी पवार यांच्यातील राजकीय सलगीची चर्चा जिल्ह्यात होत होती. २००८ च्या महापालिका निवडणुकीत महाआघाडी स्थापन करत जयंत पाटील शहरातील राजकारणात प्रवेश केला होता. यावेळीही पवार हे त्यांच्यासोबत होते; पण सर्वोदय साखर कारखान्यावरून पाटील-पवार यांच्या बिनसले. त्यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले. त्यानंतरच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पवारांचे अनेक शिलेदार सोडून गेले.

आता राष्ट्रवादीने पुन्हा पवार गटाला खिंडार पाडले आहे. पवार समर्थक माजी नगरसेवक बाळू गोंधळी, संतोष देवळेकर यांच्या नगरसेविका पती हेमंत खंडागळे यांनी सोमवारी रात्री पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. गोंधळी हे दोनदा, तर देवळेकर हे एकदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. याशिवाय खासदार संजयकाका गटाचे अभिजित पवार, सुनील भोसलें, मुफीत कोळेकर, विलास बेले यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. सध्या राष्ट्रवादीची ताकद वाढत असून, प्रवेश केलेल्या प्रत्येकाला योग्य न्याय दिला जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली. प्रारंभी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी स्वागत केले. यावेळी कमलाकर पाटील, राहुल पवार, सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान, आयुब बारगीर, सागर घोडके, विनया पाठक, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, डॉ. छाया जाधव, संगीता हारगे, ज्योती आदाटे उपस्थित होते. युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी आभार मानले.

फोटो ओळी :- संभाजी पवार समर्थक माजी नगरसेवकांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी संजय बजाज, कमलाकर पाटील, मैनुद्दीन बागवान, राहुल पवार उपस्थित होते.