शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचे महापौरपद खुले

By admin | Updated: August 17, 2014 00:44 IST

इच्छुकांची गर्दी : पक्षातील नेत्यांची डोकेदुखी वाढणार

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे पुढील अडीच वर्षांसाठीचे महापौरपद खुले झाले आहे. सध्या महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. खुल्या गटातून महापालिकेत इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने आगामी काळात सत्ताधारी नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.मुंबईत आज, शनिवारी राज्यातील २६ महापालिकांच्या आगामी काळातील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत झाली. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील फेब्रुवारी २०१६ ते आॅगस्ट २०१८ या शेवटच्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी हे पद खुले झाले आहे. सांगली महापालिकेची निवडणूक गतवर्षी जुलै महिन्यात झाली होती. आॅगस्टला नवे सदस्य मंडळ अस्तित्वात आले. आता आॅगस्ट २०१८ पर्यंत या मंडळाची मुदत आहे. सध्या अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी हे पद आरक्षित आहे. सध्या सांगलीतील कांचन कांबळे या महापौर आहेत. सुरुवातीच्या सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी सांगलीला हे पद देण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर या पदावर मिरजेतील एखाद्या सदस्याला संधी देण्यात येईल. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अडीच वर्षांच्या कालावधीतही सांगली, मिरजेला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी पहिल्या टप्प्यात सांगलीतील सदस्यांमधून दावेदारी केली जात आहे. तरीही या विषयावरून सांगली-मिरज वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. सांगलीतून हारुण शिकलगार, मिरजेतून सुरेश आवटी, किशोर जामदार यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. शिकलगार व आवटी यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. अडीच वर्षांतील पहिल्या टप्प्यासाठी दोघांमध्ये चढाओढीची चिन्हे आहेत. नवख्या सदस्यांनीही इच्छुक म्हणून हालचाली सुरू केल्या असल्या, तरी अनुभवी सदस्यांनाच या पदावर संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. (प्रतिनिधी)