शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सांगलीचे मुख्य रस्तेच बनले मृत्यूचे सापळे

By admin | Updated: June 13, 2015 00:18 IST

महापालिकेचे दुर्लक्ष : आठ दिवसात १८ जखमी, पाणी, ड्रेनेजचे खड्डे खुलेच, वाहनधारकांची कसरत

अंजर अथणीकर - सांगली -पावसाने शहराची दैना उडाली असतानाच, शहरातील मुख्य रस्ते आता मृत्यूचे सापळे बनले आहेत. पाणी, गटारी व ड्रेनेजचे खड्डे महिनोन् महिने खुलेच राहिले असून, यामध्ये पडून गेल्या आठ दिवसात अठरा जण जखमी झाले आहेत. काही ठिकाणी ठेकेदारांनी अर्ध्यावरच काम सोडल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे. नागरिकांच्या निवेदनाकडे मात्र महापालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शहरातील राजवाडा चौकानजीक कामगार विमा रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावरील गटारीवरील सुमारे चार फूट रुंद, दोन फूट लांब व सुमारे तीन फूट खोलीचा खड्डा गेल्या वर्षभरापासून खुला आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी या रस्त्यावर पाणी साचून राहते. दुचाकीस्वार, चालत जाणारे असे गेल्या आठ दिवसात याठिकाणी चौघेजण जखमी झाले आहे. रस्त्याच्या मधोमध असणारा हा खड्डा अक्षरश: मृत्यूचा सापळाच बनला आहे. महापालिका आयुक्त, महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधीश अशा महत्त्वाच्या व्यक्ती याच रस्त्यावरुन दिवसातून चार ते पाच वेळा येत-जात असताना, याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. सिटी पोस्टासमोर व बीएसएनएल कार्यालयासमोरही ड्रेनेजचे खुले खड्डे आहेत. हे खड्डेही वर्षापासूनच उघडेच आहेत. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांनी या खड्ड्याभोवती ‘काम सुरू’ असा फलक लावला आहे. जेव्हा पोलिसांचा इतरत्र बंदोबस्त असतो, तेव्हा ते हा फलक काढून नेतात. या खड्ड्यामध्येही अनेकजण पडून जखमी झाले आहेत. सिटी पोस्टासमोरील बीएसएनएल कार्यालयासमोर फूटभर उंचीची सुमारे वीस फुटाची गटार मुख्य रस्त्यातूनच गेली आहे. ही गटारही खुलीच आहे. रात्रीच्यावेळी अनेक मोटारी यामध्ये अडकून पडल्या आहेत. शंभर फुटीवरुन शामरावनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच साई कॉलनीनजीक सुमारे चार फूट लांबी- रुंदीचा व पाच फूट उंचीचा ड्रेनेजचा खड्डा सहा महिन्यापासून खुला आहे. गेल्या आठ दिवसात याठिकाणी पाच जण पडून जखमी झाले आहेत. शासकीय रुग्णालयात अजूनही काही जण उपचार घेत असल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली. शंभर फुटी रस्त्यावर त्रिमूर्ती कॉलनी चौकासमोर वीस ते तीस फुटाच्या पाईप गेल्या सहा महिन्यांपासून टाकण्यात आल्या आहेत. यावर अनेकदा मोटारी आदळत आहेत. मुख्य रस्त्यावरील खुले ड्रेनेज, पाईप, खड्ड्यांमुळे नागरिकांना मात्र जीव मुठीत धरुन जावे लागत आहे. क्रेनचा व्यवसाय जोमात सांगलीचे अनेक रस्ते चिखलमय असतानाच, पटेल चौक, सांगली हायस्कूल रस्ता, शिवाजी मंडई, शामरावनगर, टिंबर एरिया परिसर आदी ठिकाणाबरोबरच ड्रेनेज खड्ड्यांमध्ये अनेक वाहने अडकून पडत आहेत. महापालिकेकडे क्रेन उपलब्ध नाही. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांकडील लहान क्रेन व व खासगी क्रेनला मागणी वाढत आहे. क्रेन चालक वाहने खड्ड्यातून काढण्यासाठी पाचशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत घेत असल्याची माहिती क्रेन चालक फारुक सौदागर यांनी दिली.साई कॉलनीतील ड्रेनेज खड्ड्यामध्ये गेल्या आठ दिवसात चार ते पाच जण पडाले. आम्हीच या नागरिकांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. एका तरुणाचे तर सात ते आठ दातही पडले. याच्या तक्रारीही आम्ही संबंधित विभागाकडे केल्या, मात्र हा धोकादायक खड्डा तसाच आहे. पावसात हा खड्डा पाण्याने बुजून जाऊन याचा अंदाज न आल्यामुळे अपघात होत आहेत. - जब्बार पखाली, नागरिक, शंभरफुटी रस्ता,