शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
2
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
3
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
4
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
5
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
6
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
7
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
8
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
9
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
10
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
11
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
12
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
13
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
14
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
15
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
16
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
17
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
18
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
19
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
20
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!

सांगलीत घातक शस्त्रसाठा जप्त

By admin | Updated: January 19, 2015 00:23 IST

संशयितास अटक : चार गावठी कट्टे, तलवारींचा समावेश

सांगली : कुपवाड येथील हमालवाडीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून चार गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे, दोन तलवारी असा घातक शस्त्रसाठा जप्त केला. हा शस्त्रसाठा बाळगणाऱ्या सचिन रावसाहेब गावडे (वय २८, रा. हमालवाडी, कुपवाड) या संशयितास अटक करण्यात आली आहे. त्याने ही शस्त्रे बिहारमधून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली. सचिन गावडे हा नववी नापास आहे. तो एका बेदाणा व्यापाऱ्याकडे हमालीचे काम करतो. दोन वर्षांपूर्वी कुपवाडमधील दादासाहेब बंडगर व मारुती हाक्के यांच्याशी त्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून बंडगर व हाक्केयांनी त्याला धमकी दिली होती. या धमकीला तो घाबरून होता. हमालीच्या कामासाठी कुपवाडमध्ये बिहारमधील काही तरुण वास्तव्यास आहेत. यामुळे त्यांच्याशी गावडेची ओळख आहे. यातून त्याने त्यांच्याकडून बिहारमधून चार गावठी कट्टे व तलवारी मागवून घेतल्या होत्या. दोन कट्टे तो स्वत: स्वसंरक्षणासाठी बाळगत होता, तर इतर दोन कट्टे तो ग्राहक शोधून विकणार होता, अशी माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक गणेश वाघमोडे, हवालदार कुलदीप कांबळे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, अरुण टोणे, अशोक डगळे, जितेंद्र जाधव, संदीप मोरे, सचिन सूर्यवंशी, विशाल भिसे, उदय माळी, किशोर काबुगडे, प्रकाश पाटील यांच्या पथकाने गावडेला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याने कमरेला लावलेला एक गावठी कट्टा व दोन काडतुसे मिळून आली. त्यानंतर त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेण्यात आली. तिथे आणखी तीन गावठी कट्टे व दोन धारदार तलवारी सापडल्या. त्याच्याविरुद्ध कुपवाड पोलिसांत बेकायदा हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी आज, रविवारी सायंकाळी गावडेची कसून चौकशी केली. चौकशीत त्याने ही हत्यारे बिहारच्या कामगारांकडून मागविल्याची कबुली दिली आहे. (प्रतिनिधी).सरावासाठी गोळीबारगावडेकडे एक रिकामी पुंगळी सापडली आहे. त्याने सरावासाठी गोळीबार केला आहे, का आणखी कशासाठी, याची माहिती घेतली जात असल्याचे निरीक्षक घनवट यांनी सांगितले. मिरजेतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. बी. लवटे यांच्या न्यायालयात त्याला उभे केले होते. न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे