शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत बंगला फोडला

By admin | Updated: July 12, 2015 00:39 IST

तीन लाखांचा ऐवज लंपास

सांगली : विश्रामबाग येथील वृंदावन व्हिलाज सोसायटीतील सुदत्त श्रीराम पाठक यांचा ‘अनुबंध’ बंगला फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, १५ हजारांची रोकड असा तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याबाबत विश्रामबाग पोलिसांत नोंद आहे. पाठक कुटुंब ३ जुलैला सायंकाळी साडेसहा वाजता बंगल्याला कुलूप लावून पुण्याला गेले आहे. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडून लॉकरमधील रॅडो कंपनीची दोन घड्याळे, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या दोन मनगट्या, चांदीच्या देवाच्या मूर्ती, करदोडा, पदक अशी एकूण एक किलो चारशे ग्रॅम चांदी, १५ हजारांची रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केले. शुक्रवारी सायंकाळी शेजाऱ्यांना पाठक यांच्या बंगल्याचा दरवाजा उघडा दिसला. कुलूप तोडलेले दिसताच त्यांना चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी पाठक यांच्याशी संपर्क साधला. पाठक यांनी त्यांच्या मेहुण्याशी संपर्क साधून बंगल्यात जाण्यास सांगितले. रात्री उशिरा मेहुणे बंगल्यात आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांना पाचारण करण्यात आले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास पाचारण केले होते, पण श्वान बंगल्याच्या परिसरातच घुटमळले. ठसेतज्ज्ञांना चोरट्यांचे ठसे मिळाले आहेत. त्याआधारे तपास सुरू आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. शनिवारी सकाळी पाठक यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)