शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत खवा, बर्फीचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 15:38 IST

सांगली : गुजरात आणि पुणे येथे उत्पादन झालेल्या खवा व बर्फीची एसटीतून होत असलेली वाहतूक सांगलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी पहाटे रोखली. हिंगोली-कोल्हापूर या एसटीची तपासणी करुन पाचशे किलो खवा व बाराशे किलो बर्फी असा चार लाखांचा माल जप्त केला आहे.सांगलीत दररोज एसटीतून पार्सलद्वारे खवा व बर्फीची वाहतूक ...

सांगली : गुजरात आणि पुणे येथे उत्पादन झालेल्या खवा व बर्फीची एसटीतून होत असलेली वाहतूक सांगलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी पहाटे रोखली. हिंगोली-कोल्हापूर या एसटीची तपासणी करुन पाचशे किलो खवा व बाराशे किलो बर्फी असा चार लाखांचा माल जप्त केला आहे.

सांगलीत दररोज एसटीतून पार्सलद्वारे खवा व बर्फीची वाहतूक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद कोडगिरे यांचे पथक गुरुवारी मध्यरात्रीपासून सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर येणाºया प्रत्येक एसटी बसवर वॉच करीत बसले होते.

शुक्रवारी पहाटे तीन वाजता हिंगोली-कोल्हापूर एसटी आली. या एसटीतून खवा व बर्फीचे पार्सल घेताना हमालांना पकडले. हमालांच्या ताब्यातून पार्सल जप्त केली. एसटी झडती घेतल्यानंतर आणीख मोठ्या प्रमाणात माल सापडला. त्यानंतर पथकाने एसटीच्या पार्सल विभागाची झडती घेतली. तिथेही दोन दिवसापूर्वीही याच एसटीतून खवा व बर्फीची आलेली पार्सल पडून होती. यातील मालही जप्त केला. एकूण पाचशे किलो खवा व बाराशे किलो बर्फी असा चार लाखांचा माल जप्त केला.

खवा आणि बर्फीचे एकूण सहा नमुने घेण्यात आले आहे. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सहाय्यक आयुक्त शिवानंद कोडगिरे यांनी सांगितले.

सांगलीतील प्रज्वल जाधवर, संजय तोरडमल, अमोल जातवर यांच्या दहा व्यवसायिकांनी हा माल मागविला होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. या व्यवसायिकांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.

जप्त केलेली बर्फी तीन प्रकारची आहे. यामध्ये राधाकृष्ण, राधे व गायत्री अशा नावाने पॅकींग असलेली बर्फी आहे. राधे व गायत्री बर्फीचे गुजरातमध्ये तर राधाकृष्ण बर्फीचे पुण्यात उत्पादन होते. खवाही गुजरातमध्ये उत्पादन झालेला आहे. संबंधित उत्पादकांनाही चौकशीसाठी बोलविले जाणार असल्याचे कोडगिरे यांनी सांगितले.

म्हणून झाली कारवाई

कोडगिरे म्हणाले, दुग्धजन्य पदार्थाची वातानूकुलित वाहनांमधून वाहतूक केली पाहिजे. एसटीतून वाहतूक करणे चुकीचे आहे. हा नाशवंत माल असतो. ग्राहकांना त्याची तशीच विक्री केली तर त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. उत्पादक व व्यवसायिकांनी याची कोणतीही काळजी न घेता मा मालाची वाहतूक केली आहे. त्यामुळे ही कारवाई केली आहे.