सांगली : जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षित असून २१ सप्टेंबर रोजी निवडी होणार आहेत. अध्यक्षपदासाठी तासगाव तालुक्यातील सावळज गटातील कल्पना सावंत, येळावीच्या स्नेहल पाटील, मणेराजुरीच्या योजना शिंदे, चिंचणीच्या शुभांगी पाटील या चार महिला प्रमुख दावेदार आहेत. आटपाडी तालुक्यातील दिघंचीच्या मनीषा पाटील आणि शिराळा गटातील सदस्या व विद्यमान महिला-बालकल्याण समिती सभापती वैशाली नाईक यांनीही अध्यक्षपदावर दावा सांगितला आहे. नेत्यांनी आमच्या नावाचा विचार केलाच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. उपाध्यक्ष पदाचीही दि. २१ रोजीच निवड होणार असून यासाठी लिंबाजी पाटील प्रमुख दावेदार आहेत. तरीही कवठेमहांकाळ, जत तालुक्याला संधी मिळू शकते. जिल्ह्यातील दहा पंचायत समित्या असून तेथील सभापती, उपसभापतींच्या निवडी १४ सप्टेंबर रोजी होत आहेत. येथील निवडीही चुरशीच्या होणार असून तेथील बहुतांशी नावे निश्चित झाली आहेत. (प्रतिनिधी)
सांगली : झेडपी अध्यक्षपदाच्या सहाजणी दावेदार
By admin | Updated: September 9, 2014 23:48 IST