शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जि.प. सभापती निवडीत घोरपडे गट, स्वाभिमानीला डावलले

By admin | Updated: April 6, 2017 13:49 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदी भाजपाचे ब्रम्हानंद पडळकर, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी रयत विकास आघाडीच्या सुषमा नायकवडी यांच्या बिनविरोध निवडी गुरुवारी झाल्या.

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 6 - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदी भाजपाचे ब्रम्हानंद पडळकर, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी रयत विकास आघाडीच्या सुषमा नायकवडी यांच्या बिनविरोध निवडी गुरुवारी झाल्या. सभापती निवडीमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला डावलण्यात आले. विषय समितीच्या सभापती निवडीमध्ये आमदार विलासराव जगताप गटाचे तमनगोंडा रवी आणि मिरज तालुक्यातून आमदार सुरेश खाडे गटाचे अरुण राजमाने यांची निवड झाली.
 
माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सभापती पदाची मागणी करण्यात आलेली होती, मात्र बुधवारी मुंबई मध्ये भाजपा आणि मित्र पक्षांच्या बैठकीत मित्र पक्षांची समजूत काढण्यास भाजपाला यश आले.गुरुवारी जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहात सभापती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम झाला. यामध्ये विषय समित्यांची एकूण चार तर महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण सभापती पदासाठी प्रत्येकी दोन नामनिर्देशन पत्र दाखल झाले. 
 
यामध्ये विषय समित्यांसाठी तमनगोंडा रवी, अरुण राजमाने, जितेंद्र पाटील, सतीश पवार यांचे अर्ज आले होते. तर महिला व बालल्याण सभापती पदासाठी रयत विकास आघाडीच्या सुषमा नायकवडी आणि काँग्रेसच्या कलावती गौरगौड, समाज कल्याण सभापती पदासाठी भाजपाचे ब्रम्हानंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे भगवान वाघमारे असे अर्ज आलेले होते.
 
अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत सत्ताधारी भाजपाला चाल देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्व अर्ज माघारी घेतले, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती पदी भाजपचे ब्रम्हानंद पडळकर तर महिला व बालकल्याण सभापती पदी रयत विकास आघाडीच्या सुषमा नायकवडी यांच्या बिनविरोध यांची बिनविरोध निवड झाली, तर विषय समित्यांसाठी तमनगोंडा रवी, अरुण राजमाने यांनाही सभापती पदाची संधी मिळाली.
 
निवडीनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी नवनिर्वाचित सभापतीना शुभेच्छा दिल्या, तर काँग्रेस राष्ट्रवादीला मिळून काम करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, राहुल महाडिक, गोपीचंद पडळकर,  दीपक शिंदे, शेखर इनामदार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड आदी उपस्थित होते.