शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पाच लाखांचा ऐवज लंपास

By admin | Updated: May 21, 2014 17:35 IST

चोरट्यांचा धुमाकूळ : गुलमोहर कॉलनीत बंगला फोडला

 सांगली : येथील गुलमोहर कॉलनीतील समर्थ मारुती मंदिराजवळील सतीश प्रभुदास सामाणी यांचा ‘पृथा’ हा बंगला फोडून चोरट्यांनी ४५ हजारांची रोकड, सोनसाखळी, सोन्याची दोन घड्याळे, चांदीची भांडी असा एकूण पाच लाखांचा ऐवज लंपास केला. आज, मंगळवारी सायंकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सतीश सामाणी चार दिवसांपूर्वी कुटुंबीयांसह गुजरातला गेले होते. गुलमोहर कॉलनीत राहणार्‍या आपल्या मावशीला त्यांनी दररोज सायंकाळी बंगल्याच्या पोर्चमधील दिवे लावण्यास सांगितले होते. रविवारी सायंकाळी मावशी दिवे लावून गेल्या होत्या. सोमवारी सकाळी त्या दिवे मालविण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना बंगल्याच्या पाठीमागील खिडकी उघडी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता, शटरचा दरवाजाही उचकटल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी सामाणी यांच्याशी संपर्क साधून बंगल्यात चोरी झाली असावी, असे सांगितले. त्यामुळे सामाणी कुटुंबीय सांगलीला येण्यासाठी निघाले होते. आज सकाळी ते आल्यानंतर चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील शटरचा दरवाजा उचकटला होता. शटरला लागून आणखी एक लाकडी दरवाजा होता. त्याचा कडी व कोयंडा उचकटून चोरटे बंगल्यात गेले. बेडरूममधील कपाटातील साहित्य विस्कटून टाकून त्यातील ४५ हजारांची रोकड, दोन सोन्याची घड्याळे, एक सोनसाखळी, चांदीची परात, तीन ताटे असा एकूण पाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरा सामाणी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)