सांगली : शहरातील हडको कॉलनी परिसरात घराबाहेर मोबाईलवर बोलत थांबलेल्या महिलेस दोघांनी मारहाण केली. याप्रकरणी महिलेने अमीर खाटिक, अरबाज खाटिक (दोघेही रा. हडको कॉलनी, कुपवाड रोड, सांगली) यांच्याविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी महिलेने संशयितांकडून घर गहाणवट घेतले आहे. शुक्रवारी सकाळी या घराबाहेर थांबून ती मोबाईलवर बोलत होती. यावेळी संशयित तिथे आले व त्यांनी ‘माझा भाऊ झोपला आहे, फोनवर का बोलत आहेस’ असे म्हणत महिलेच्या हातातील मोबाईल घेऊन भिंतीवर डोके आपटला व तिला मारहाण केली. तसेच पैसे न देता तुला हाकलून देतो अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोघा संशयितावर संजयनगर पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.