शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

सांगलीत दररोज शंभर कुत्री पकडणार

By admin | Updated: June 22, 2016 00:10 IST

रवींद्र खेबूडकर : महापालिकेचा कृती आराखडा तयार

सांगली : शहरात नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार केला असून, दररोज शंभर कुत्री पकडून त्यांची नसबंदी करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिका हद्दीत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. एका मुलीसह सहा महिन्यांच्या बालिकेवर कुत्र्यांनी हल्ला केला होता. या घटनेची महापालिका आयुक्त खेबूडकर यांनी गंभीर दखल घेतली. मंगळवारी महापौर हारुण शिकलगार यांच्या उपस्थितीत आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे व स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खेबूडकर म्हणाले की, महापालिका क्षेत्रात कुत्री पकडण्याची मोहीम तीव्र करीत आहोत. सध्या दररोज ३० कुत्री पकडली जातात. त्याचे प्रमाण शंभरपर्यंत वाढविले जाणार आहे. त्यासाठी दोन सत्रात कुत्री पकडण्याची मोहीम राबविली जाईल. पालिकेकडे दोन डॉग व्हॅन असून, त्यावर आठ कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता जादा प्रशिक्षित सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना कुत्री पकडण्यासाठी जाळ्याही देण्यात आल्या आहेत. त्याचा खर्च महापौरांनी उचलला आहे. नसबंदीसाठी एक एजन्सी नियुक्त करण्यात येत आहे. या एजन्सीकडून पंधरा दिवसाचे काम करून घेतले जाईल. या कालावधीत रितसर निविदा प्रक्रिया राबवून नसबंदीची एजन्सी नियुक्त होईल. जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. राम हंकारे यांनी १०० रॅबीपूर लसी देण्याचे मान्य केले आहे. यापूर्वीही जिल्हा परिषदेने सहकार्य केल्याचे खेबूडकर म्हणाले. (प्रतिनिधी)चिकन सेंटर्सची आज बैठकशहरात १९७ चिकन सेंटर व १५० हातगाडे आहेत. त्यांची बुधवारी दुपारी बारा वाजता बैठक आयोजित केली आहे. या सेंटरवरील ओला कचरा उचलण्याबाबत उपाययोजना करणार आहोत. सेंटरचालकांनी स्वत: पिशव्यामधून ओला कचरा जमा करावा. त्यानंतर पालिकेचे दोन कंटेनर शहरात फिरून हा कचरा जमा करतील, असेही खेबूडकर म्हणाले.