शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत बंद कडकडीत पाळणार

By admin | Updated: June 5, 2017 00:10 IST

सांगलीत बंद कडकडीत पाळणार

सांगली : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी सांगली बंद व मोर्चाचे आयोजन केले आहे. सर्व शेतकरी संघटना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, शेकाप यामध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या निमित्ताने आता आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी सर्वपक्षीय ताकद एकवटण्यात येत आहे. भाजप वगळता सर्व पक्ष, संघटनांनी एकत्रितपणे आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी घेतला. ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा देण्यासाठी आज सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. किसान सभा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी यासंदर्भात चर्चा केली आणि सर्व पक्ष, संघटनांना एकत्रित केले. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सांगलीच्या स्टेशन चौकात शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र येणार आहेत. स्टेशन चौकातून सुरू झालेला मोर्चा राजवाडा, मेन रोड, मारुती रोड, शास्त्री चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी मंडई, छत्रपती शिवाजी पुतळा, तरुण भारत क्रीडांगण, महापालिका, राजवाडा चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात येणार आहे. याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सभाही घेतली जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी सांगितले की, शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, कमी व्याजदराने कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सर्वच घटकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. किसान सभेचे उमेश देशमुख म्हणाले की, संप मिटल्याची चर्चा पसरवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्यास सडेतोड उत्तर देण्यासाठी व आम्ही सर्व एकसंध आहोत, हे सांगण्यासाठी आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवित आहोत. यांचा आंदोलनास पाठिंबा...काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, अजिंक्य पाटील, बजरंग पाटील, अनिल शेटे, जनता दलाचे अ‍ॅड. के. डी. शिंदे, जनार्दन गोंधळी, मनसेचे माजी आमदार नितीन शिंदे, स्वाती शिंदे, अमर पडळकर, शहर सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, हमाल पंचायतीचे विकास मगदूम, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील, शेतकरी संघटनेचे सुनील फराटे, अशोक माने, आदी नेत्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला असून, ते मोर्चात सहभागी होणार आहेत.