शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

दिल्लीच्या मराठा मोर्चाला सांगलीचा आवाज

By admin | Updated: October 7, 2016 00:06 IST

नियोजनात गलाई बांधव : केंद्रात कार्यरत नेत्यांच्या भेटी, बैठकांच्या माध्यमातून आंदोलनाच्या तयारीला वेग

शरद जाधव -- सांगली -विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे सुरू असताना, आता हा मोर्चा थेट देशाच्या राजधानीत दिल्लीत धडकणार आहे. दिल्लीतील मोर्चासाठी जिल्ह्यातील गलाई बांधवांनी मोट बांधली असून, मोर्चाचे नियोजन, बैठका, शासकीय पातळीवर नेत्यांच्या भेटी यासाठी कंबर कसली आहे. या बांधवांच्या सहभागामुळे सांगलीचा आवाज दिल्लीत घुमणार आहे. नैसर्गिक अवकृपा आणि त्यामुळे करावा लागणारा संघर्ष सोसत खानापूर, आटपाडी तालुक्याचे नाव देशातच नव्हे, तर जगभर पोहोचविण्यात गलाई बांधव यशस्वी झाले आहेत. देशातील असे एकही शहर नाही, की तेथे येथील गलाई व्यावसायिक पोहोचलेला नाही. राज्यभर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे लोण देशपातळीवरही पोहोचले असून, या महिन्याच्या अखेरीला दिल्लीत मराठ्यांचा आवाज घुमणार आहे. या मोर्चाचे जोरदार नियोजन चालू असून, या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ते जिल्ह्यातील गलाई बांधव. गलाई व्यवसायाच्या निमित्ताने दिल्ली परिसरात स्थायिक झालेल्या मराठा बांधवांची, राज्यातील मराठा क्रांती मोर्चे पाहून घालमेल होत होती. इच्छा असूनही त्यात सहभागी होता येत नसल्याने समाजातील प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी दिल्लीतच मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त करत त्याचे नियोजन सुरू केले आहे. केवळ मराठा बांधवांपर्यंत न पोहोचता केंद्र सरकारमधील मंत्री, सर्व राजकीय पक्षात कार्यरत असणाऱ्या मराठी नेत्यांच्या भेटी घेत वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. दिल्लीत गलाई बांधवांबरोबरच सर्वोच्च न्यायालयात कार्यरत शंभरावर मराठी वकील, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणावर असणारे ‘रोड मराठा’ही यात सहभागी होणार आहेत. ५उत्तर भारतातील गलाई बांधवदिल्लीसह उत्तर भारतातील सर्व मराठा बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत. लखनौ, कुरूक्षेत्र, पानिपत, कर्नाल, पंजाब, अमृतसर, जम्मू येथील मराठा बांधवांनी दिल्लीतील मोर्चात सहभागी होण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे दिल्लीतील मोर्चाही ऐतिहासिक ठरणार आहे.राज्यभर मोठा प्रतिसाद मिळत असल्याने मराठा क्रांती मोर्चाची दिल्लीत जोरदार चर्चा सुरू आहे. दिल्लीतील मोर्चाचे नियोजन सुरू आहे. मराठा बांधव दिल्लीतील मोर्चाचे नियोजन करत आहेत. केवळ दिल्लीच नव्हे, तर या मोर्चात उत्तर भारतातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने दिल्लीतील मोर्चा यशस्वी होईल यात शंकाच नाही. - प्रदीप पाटील , गलाई व्यावसायिक, आयोजक मराठा क्रांती मोर्चा, दिल्ली मराठा समाजातील विविध मागण्यांसाठी राज्यात महाविराट मोर्चे काढले जात असताना, त्यात सहभागी होता येत नसल्याची खंत होती. मात्र, दिल्लीत स्थायिक झालेल्या सर्व मराठा बांधवांच्या पुढाकाराने दिल्लीतच मराठा क्रांती मोर्चा काढण्याबाबत चर्चा झाली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्चाचे नियोजन सुरू असून, दिल्लीतील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील. - विशाल साळुंखे (मेंगाणवाडी), आयोजक, मराठा क्रांती मोर्चा, दिल्ली.