शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-- ट्रक, दुचाकी चोरट्यास अटक

By admin | Updated: August 28, 2014 23:05 IST

एलसीबीची कारवाई : ३२ लाखांच्या तीन ट्रकसह दुचाकी जप्त

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अट्टल चोरटा पैगंबर सिकंदर शेख (वय २६, रा. तासगाव फाटा, मिरज) यास अटक करुन, त्याने चोरी केलेले तीन ट्रक व एक दुचाकी असा सुमारे ३२ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. त्याने या वाहनांची चोरी सोलापूर, इचलकरंजी व कर्नाटकातील कागवाड येथून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून आखणीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक पोलीस फौजदार एम. डी. पाटील, हवालदार मारुती सूर्यवंशी, विकास पाटणकर, शशिकांत जाधव आदींचे पथक बुधवारी मिरज शहरात गस्त घालत असता, पैगंबर शेख हा मिरज रेल्वे स्थानक परिसरात वाहनांच्या स्पेअर पार्टची विक्री करीत असताना संशयास्पदरित्या आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने तीन ट्रक व एक दुचाकी असा एकूण ३२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन ट्रक व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याने सोलापूर, इचलकरंजी व कागवाड (जि. बेळगाव, कर्नाटक) येथून ट्रकची चोरी केली असून, मिरजेतून दुचाकीची चोरी केली आहे. सोलापूर येथून टाटा कंपनीचा (क्र. एमएच ०४, एफपी ९२५२) हा बारा लाखांचा ट्रक चोरला असून, याबाबत सोलापूर येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इचलकरंजी येथून ट्रक (क्र. एमएच ०९. जेए ९१४९) चोरुन तो त्याने तासगाव येथील एक शेतात सोडून दिला. याबाबत इचलकरंजी येथील गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागवाड (जि. बेळगाव) येथून त्याने (क्र. केए. २५ बी २४३४) हा दहा लाखांचा ट्रक चोरी केला असून, अद्याप या ट्रकचा मालक सापडलेला नाही. त्याने या ट्रकचा चेसीस क्रमांक वेल्ड करुन बदलला आहे. याशिवाय त्याने मिरजेतून हिरो होंडा दुचाकीची (क्र. एमएच १०, एटी १९९४) चोरी केली असून याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोहिमेत हवालदार शशिकांत जाधव, विकास भोसले, निवास माने, किशोर काबुगडे आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)