शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ट्रक टर्मिनस होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका क्षेत्रातील मोठ्या व्यापारी पेठा, मार्केट यार्डात होणारी उलाढाल यामुळे सांगली शहरात मोठ्या संख्येने अवजड वाहने दाखल होत आहेत. त्यांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न शहराला भेडसावत आहे. त्यामुळे सुमारे ५८ कोटी रुपये खर्चाचा अद्ययावत ट्रक टर्मिनसचा प्रस्ताव रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला आहे, अशी माहिती ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका क्षेत्रातील मोठ्या व्यापारी पेठा, मार्केट यार्डात होणारी उलाढाल यामुळे सांगली शहरात मोठ्या संख्येने अवजड वाहने दाखल होत आहेत. त्यांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न शहराला भेडसावत आहे. त्यामुळे सुमारे ५८ कोटी रुपये खर्चाचा अद्ययावत ट्रक टर्मिनसचा प्रस्ताव रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला आहे, अशी माहिती आ. सुधीर गाडगीळ यांनी दिली.ते म्हणाले की, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात अनेक व्यापारी पेठा व मार्केट यार्ड आहे. याठिकाणी दररोज शेकडो अवजड वाहने दाखल होत असतात. एकाचवेळी या अनेक अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी सध्या शहरात जागाच उपलब्ध नाही. सध्याच्या वाहनतळात पुरेशा सुविधा नसल्याने तसेच अविकसित भाग असल्याने सर्व वाहने शहरामधील रहिवासी क्षेत्रातील रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे पार्क केली जातात. प्रतिदिनी जवळपास ५०० ते ६०० ट्रक अशाप्रकारे रस्त्याकडेला लावले जातात. त्यामुळे या रहिवासी वस्तीमधील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.अस्ताव्यस्त पार्किंगमुळे शहरामधील सर्व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी सध्या वापरात असलेल्या वाहन तळाच्या जागेवर अद्ययावत पद्धतीने सर्व सुविधांनी सुसज्ज वाहन तळ (ट्रक टर्मिनस) विकसित करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने याकामी नियुक्त केलेल्या वास्तुविशारदांनी प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यामध्ये ट्रक टर्मिनस जागेचा विकास करण्याकरिता अंदाजपत्रकानुसार अपेक्षित खर्च रुपये १२ कोटी ६१ लाख ९३ हजार २७0 इतका गृहित धरला आहे. तसेच ट्रक टर्मिनस जागेमध्ये विकसित करावयाच्या इमारत बांधकामाचा अंदाजपत्रकानुसार अपेक्षित खर्च रुपये ४४ कोटी ६३ लाख ५२ हजार ७२१ रुपये गृहित धरला आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत अत्यल्प असल्याने केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. हे ट्रक टर्मिनस झाल्यास सांगली शहरास भेडसावणारी मोठी समस्या दूर होईल. तसेच येथील नागरिकांना होणारा त्रास कमी होईल.या ठिकाणी येणाºया वाहनधारकांना सर्व सोयी-सुविधा मिळाल्यामुळे त्यांचाही त्रास कमी होईल व शहरावरील वाहतुकीचा ताण नाहीसा होईल. त्यामुळेच नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतची कल्पना दिली. त्यांनीही यास सकारात्मक प्रतिसाद दिला.यावेळी आ. सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, प्रशांत शहा, पांडुरंग कोरे उपस्थित होते.५८ कोटी खर्चट्रक टर्मिनस उभारण्यासाठी सुमारे ५८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध व्हावा यासाठी निवेदन दिले आहे. गडकरी यांनी तातडीने याची दखल घेत ट्रक टर्मिनससाठी लवकर प्रस्ताव मागवून घेण्यासाठी संबंधित अधिकाºयांना आदेश दिले.