शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत आज बहुजन क्रांती मोर्चाचा एल्गार

By admin | Updated: January 19, 2017 00:25 IST

तयारी पूर्ण : पंधरा लाखांच्या सहभागाचा आयोजकांचा दावा; १२० संघटनांचा पाठिंबा

सांगली : अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करा, यासह ३८ मागण्यांसाठी दि. १९ रोजी बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी १० वाजता काँग्रेस भवन येथून मोर्चास सुरुवात होणार आहे, तर पुष्पराज चौकात जाहीर सभेने मोर्चाची सांगता होणार आहे. पंधरा लाख समाजबांधव या मोर्चात सहभागी होतील, असा दावा संयोजकांनी केला आहे.सांगलीत मोर्चाच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी जयसिंग शेंडगे, प्रा. नामदेवराव करगणे, अरूण खरमाटे, सुरेश चिखले, प्रल्हाद मलमे, सुनील होवाळे, अशोक गोसावी, फारूख संगतरास, शशिकांत गायकवाड, संदीप कांबळे, भास्कर खोत, जमीर जमादार, रमेश कोरडे, मुनीर आब्बास पट्टेकरी, प्रवीण तेली यांची संयुक्त पत्रकार परिषद बुधवारी झाली. यावेळी ते म्हणाले की, मोर्चामध्ये सर्व जाती, धर्मातील लोक, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटना, खासगी संस्थांतील कर्मचारी संघटना, रिक्षा संघटनेसह जिल्ह्यातील १२० संघटना व पक्षांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे, अशी माहिती देण्यात आली.बहुजन समाजाच्या अडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी, शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. अनेक समाज लोकसंख्येने छोटे असल्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. म्हणूनच सर्व बहुजन समाज एकत्र आला आहे.त्यांच्या अ‍ॅट्रॉसिटी कायदा, धनगर, रामोशी, कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, मराठा, मुस्लिम समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण मिळाले पाहिजे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, महामंडळाला निधी, लिंगायत व जैन धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा, महापुरूषांच्या जयंतीला शासकीय सुटी देण्यात यावी, यासह ३८ मागण्यांसाठी हा बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पंधरा लाखांहून अधिक समाजबांधव सहभागी होणार आहेत. आंदोलनकर्त्यांपैकी काही लोक सकाळी ९.१५ वाजता सांगलीतील शिवाजी मंडई येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि बसस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी जातील. त्यानंतर महिलांचे शिष्टमंडळ सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर मोर्चाची सुरुवात काँग्रेस भवन येथून सकाळी दहा वाजता होणार आहे. पुष्पराज चौक येथे जाहीर सभा होणार आहे.येथे आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ-बोर्डाचे कार्यकारी सदस्य मौलाना सज्जाद नौमानी, विश्व लिंगायत महासभेचे कार्यकारी अध्यक्ष कोर्णेश्वर महास्वामी, वामन मेश्राम, जयसिंग शेंडगे आदी मार्गदर्शन करणार आहेत. (प्रतिनिधी)जय्यत तयारी : चार हजार वाहनांची व्यवस्थामोर्चामध्ये जिल्ह्यातील बहुजन समाजाला सहभागी होता यावे, यासाठी एक हजार ट्रक, तसेच तीन हजार चारचाकी वाहनांची व्यवस्था केली आहे. तसेच या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली आहे. पार्किंग व्यवस्थेसह आंदोलकांच्या मदतीसाठी पाच हजार स्वयंसेवक काम करणार आहेत. प्रमुख नेते आणि आंदोलकांपर्यंत आंदोलनाच्या धोरणाविषयीची माहिती पोहोचविण्यासाठी पुष्पराज चौक ते विश्रामबाग, राम मंदिर चौक, स्टेशन चौक, कॉलेज कॉर्नर रस्ता, आंबेडकर रस्ता याठिकाणी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती संयोजक सुनील होवाळे यांनी दिली.आज सलून दुकाने बंदसांगलीत आज दि. १९ रोजी बहुजन क्रांती मोर्चा निघणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व नाभिक बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सलून दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. सांगलीतील सेना मंदिर येथे नाभिक बांधव एकत्र जमून मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश चिखले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.