शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पॅटर्नविरुद्ध सांगलीकरांचा एल्गार

By admin | Updated: November 5, 2015 23:54 IST

विकासासाठी एकत्र : वीस सर्वपक्षीय नगरसेवकांचा गट सरसावला

सांगली : महापालिकेतील मिरजकर नगरसेवकांचा वरचष्मा कमी करण्यासाठी सांगलीतील नगरसेवक सरसावले आहेत. सांगली व कुपवाडमधील वीस सर्वपक्षीय नगरसेवकांनी यापुढे विकास कामांसाठी दबावगट तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मिरज पॅटर्नच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधीचा निधी पळविणाऱ्यांना या गटाकडून शह दिला जाणार आहे. सध्या तरी ही चर्चा प्राथमिक पातळीवर असली तरी, तिला लवकरच मूर्त स्वरूप मिळेल, असे दिसते. महापालिकेच्या स्थापनेपासून गेली सोळा वर्षे मिरजेतून निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी नेहमीच सत्ताधारी नेत्यांवर दबाव ठेवला होता. पालिकेत सत्ता कोणाचीही असो, मिरजकरांचीच चलती असायची. मग जयंत पाटील असो अथवा मदन पाटील असो, या नेत्यांना सत्तेची गणिते जुळविताना नेहमीच मिरजकरांना झुकते माप द्यावे लागले आहे. ‘मिरज पॅटर्न’ या गोंडस नावाखाली नगरसेवकांनी नेत्यांवर वरचष्मा गाजविला आहे. विकास कामाचा निधी जास्तीत जास्त मिरजेत खर्च व्हावा, यासाठी हे सदस्य आक्रमक असतात. त्यातच पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते मदनभाऊ पाटील यांचे निधन झाल्याने, समीकरणेच बदलणार आहेत. पालिकेच्या कारभारात त्यांचा शब्द अंतिम होता. पण आता दबदबाच संपल्याने सांगलीकरांना कोण वाली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी विचारविनियम सुरू केला आहे. शहरातील विविध विकासकामे, शासकीय योजना मार्गी लावण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांवर दबाव असावा, असा सूर उमटत आहे. त्यासाठी सर्वपक्षीय वीस नगरसेवकांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षीय जोडे बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी यापुढे काम करण्याचा निर्धार केला जात आहे. या दबाव गटात सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीसह स्वाभिमानी आघाडीचे नगरसेवक आहेत. सध्या या दबाव गटाची निर्मिती चर्चेच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. लवकरच तिला मूर्त स्वरुप देण्याचा निर्धार केला आहे. त्यात त्यांना कितपत यश मिळते, हे भविष्यातच कळेल. (प्रतिनिधी)धास्ती कायम : टिकाव लागणार का?सांगली, कुपवाडच्या नगरसेवकांनी जरी एकत्रित गट केला तरी आजपर्यंतचा अनुभव पाहता ते पुन्हा मिरजकरांच्या अधिपत्याखाली जाऊ शकतात. त्यामागे अर्थपूर्ण तडजोडी हे प्रमुख कारण आहे. आतापर्यंत महापालिकेचा राजकारणात या घडामोडी घडल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आता सांगलीकरांनी बाह्या सरसावल्या असला तरी त्यांचा टिकाव लागणार का? ते किती काळ एकत्र राहणार, हाच खरा प्रश्न उपस्थित केला जात आहे.