शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कडकडीत बंद, रस्ते ओस, सर्व व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:03 IST

BharatBand, FarmarStrike, Sangli शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला मंगळवारी सांगलीत शहरातही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी दहा वाजता उघडणारी दुकाने पूर्णपणे बंद होती. काही मोजक्याच दुकानदारांनी व्यवहार सुरू केला होता. पण नंतर तोही बंद केला. मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

ठळक मुद्देसांगलीत कडकडीत बंद, रस्ते ओस सर्व व्यवहार ठप्प : मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र शुकशुकाट

सांगली : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला मंगळवारी सांगलीत शहरातही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी दहा वाजता उघडणारी दुकाने पूर्णपणे बंद होती. काही मोजक्याच दुकानदारांनी व्यवहार सुरू केला होता. पण नंतर तोही बंद केला. मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. या बंदला शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह विविध सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिला होता. या बंदला शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. बहुतांश व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद ठेवली होती.

कापडपेठ, मेन रोड, हरभट रोड, गणपती पेठ, मारुती रोड या परिसरातील व्यवहार बंद होते. त्यातूनही सकाळच्या टप्प्यात काही दुकानदारांनी दुकाने उघडली होती. पण शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची रॅली येताच त्यांनीही दुकाने बंद केली. काही ठिकाणी मात्र दुकानदार व आंदोलकांत बाचाबाचीही झाली.

मुख्य बाजारपेठेसह मार्केट यार्ड, राममंदिर, वखार भाग परिसरातील व्यवहार बंद होते. शहरातील औषध दुकाने, दुध केंद्र वगळता इतरांनी बंदला पाठिंबा दिला होता. जनसेवा भाजी विक्रेता संघानेही बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे शहरातील मंगळवारचे सर्वच बाजार बंद करण्यात आले होते.

शिवाजी मंडईत काही विक्रेते भाजीपाला विक्रीसाठी आले होते. पण थोड्या वेळाने त्यांनीही गाशा गुंडाळला. हॉटेल व्यवसायिक, पानपट्टीचालकांनीही बंदमध्ये भाग घेत व्यवसाय बंद ठेवले होते. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते ओस पडले होते.