शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

सांगली -शांतिनिकेतनमध्ये उलगडणार दगडांचे विश्व अनोखा उपक्रम : संकलनाच्या वाटेवरून संशोधनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:12 IST

सांगली : निसर्ग प्रत्येक ठिकाणी का बदलतो, याचे कुतूहल आणि त्यातून संशोधन पूर्वीपासूनच चालत आले आहे.

अविनाश कोळी ।सांगली : निसर्ग प्रत्येक ठिकाणी का बदलतो, याचे कुतूहल आणि त्यातून संशोधन पूर्वीपासूनच चालत आले आहे. याच विचारातून आता परिसरातील दगडांचा संशोधक वृत्तीने शोध घेऊन त्यांच्या संकलनाचा वेगळा उपक्रम सांगलीच्या शांतिनिकेतनने हाती घेतला आहे.

सर्व वयोगटांसाठी हा उपक्रम खुला ठेवण्यात आला आहे. कोणताही खर्च न करता केवळ संशोधक वृत्ती घेऊन यात सहभागी व्हायचे आहे. प्रकार, आकार, रंग आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी सजलेले दगड सहजरित्या आढळत असतात. पाण्याच्या वेगवेगळ्या प्रवाहांमध्येही दगडांचे अनेक प्रकार दिसतात. कधीही फिरस्त्याच्या हातून फिरत फिरत काही दगड परिसरात येऊन येथील मातीशी नाते जोडत असतात. या दगडांच्या आकाराला, रंगाला काहीतरी वैशिष्ट्य चिकटलेले असते. हे सारे विश्व उलगडण्याचा प्रयत्न होणार आहे.

दगडांमधून मंदिरे, प्रार्थनास्थळे, विविध वास्तू, मूर्ती, कलात्मक आविष्कार, गृहोपयोगी वस्तू यांची निर्मिती होत असते. दगडांमधील शीतलता आणि दाहकतासुद्धा उत्सुकतेचा विषय असतो. आकाशातून पृथ्वीतलावर पडलेल्या दुर्लक्षित दगडांचाही शोध अशाच प्रकारच्या संशोधनातून लागलेला आहे. दगड किती प्रकारचे असू शकतात, याचेही उत्तर कोणाकडे नाही. त्यामुळेच शक्य तेवढ्या दगडांचे संकलन करून त्यांचा संग्रह लोकांसाठी माहितीसह उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

वेगवेगळ्या जातीचे, रंगांचे दगड शोधताना प्रत्येकाने दगडांच्या प्रेमात पडावे, निसर्गाच्या कलाकृतीला दाद द्यावी, असाही उद्देश आहे. शांतिनिकेतनच्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाने यासाठी स्पर्धा घेतली आहे. वेगळ्या जातीचे, रंगांचे दगड शोधायचे, त्यांची माहिती मिळवायची आणि दगड एका पिशवीत घालून, पिशवीवर नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक लिहून तो या ग्रंथालयाकडे १ जूनपर्यंत पाठवावा, असे आवाहन शांतिनिकेतनमार्फत करण्यात आले आहे.उपक्रमातून उभारणार संग्रहालयउपक्रमातून जमा झालेल्या दगडांचे संग्रहालय शांतिनिकेतनच्या हिरवाईत सजणार आहे. बऱ्याचदा सापडलेले दगड नेमक्या कोणत्या प्रकारातले आहेत, याची माहिती नसते. त्यामुळे त्यांनी संकलित करून दिलेल्या दगडांची माहिती संबंधित तज्ज्ञांमार्फत घेतली जाणार आहे. संग्रहालयात दगडाच्या माहितीसह ती उपलब्ध करून दिली जाणार आहे.