शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचा निकाल ६ तासात वीस

By admin | Updated: May 13, 2014 00:45 IST

फेर्‍या : एकावेळी ६० हजार मतांची मोजणी

सांगली : सांगली लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. एकूण २० फेर्‍यात मतमोजणी होणार असून, एकाचवेळी १४ टेबलांवर ६० हजार मतांची मोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी चारशे मिनिटे म्हणजे साडेसहा तासांचा कालावधी लागेल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले की, सांगली लोकसभा मतदार संघात साडेदहा लाख मतदान झाले आहे. तसेच चार हजार ३८८ मते पोस्टाद्वारे आली आहेत. या मतांच्या मोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. उद्या, मंगळवारी मतमोजणीची रंगीत तालीम होणार आहे. लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात १४ टेबलांवर एकाचवेळी मतमोजणी सुरू होईल. मिरज विधानसभेच्या २१ फेर्‍या, सांगली २१, पलूस-कडेगाव २०, खानापूर २४, तासगाव-कवठेमहांकाळ २१, जत २० अशा सरासरी २० फेर्‍या होतील. एका टेबलावर ७०० ते ८०० मतमोजणी गृहित धरता, एकावेळी ६० हजार मतांची मोजणी होईल. मतमोजणीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरासह जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेरही १०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असेल. मतमोजणीसाठी ६०० कर्मचारी नियुक्त केले आहेत. निकालानंतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, कायदा मोडणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही कुशवाह यांनी दिला. (प्रतिनिधी)