शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सांगली पोलिसांचा कोल्हापुरात छापा; वाहन चोरट्यांची टोळी जेरबंद : चौघांचा समावेश,२२ लाखांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:25 IST

सांगली : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात ट्रक, डम्परसह विविध वाहने चोरुन त्यांचे सुटे भाग करुन ते भंगार विक्रेत्यांना विक्री

सांगली : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात ट्रक, डम्परसह विविध वाहने चोरुन त्यांचे सुटे भाग करुन ते भंगार विक्रेत्यांना विक्री करणाºया टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला शुक्रवारी यश आले. टोळीतील चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन वाहनांसह, वाहनांचे सुटे भाग असा २२ लाखांचा माल जप्त केला आहे.

अटक केलेल्यांमध्ये अनिस रशीद चौधरी (वय २७, रा. खंडोबानगर, मलकापूर, ता. कºहाड), मंगू तुकाराम घुणके (३०, कसबे डिग्रज, ता. मिरज), असिफ राजू शेख (३३, सुतार प्लॉट, कोल्हापूर रस्ता, सांगली) व परवेज सादखान पटेल (४१, साळे गल्ली, सोमवार पेठ, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी वाहने चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. अनिस चौधरी व मंगू घुणके सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून वाहने चोरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये सांगलीतील ईदगाह मैदानाजवळील मैदानातून ट्रक चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत वाहने चोरलेल्या गुन्ह्यांचा पाढाच वाचला.

वाहने चोरीच्या या कृत्यामध्ये त्यांच्यासोबत असिफ शेख व परवेज पटेल या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. चार दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कोल्हापुरात छापा टाकून परवेज पटेल यास ताब्यात घेतले होते. पटेलचे कोल्हापुरात भंगार विक्री व खरेदीचे दुकान आहे. अनिस चौधरी, मंगू घुणके व असिफ शेख हे तिघेही वाहन चोरल्यानंतर ते पटेलकडे घेऊन जात होते. त्याच्या भंगार विक्रीच्या दुकानात ते त्या वाहनांचे भाग सुटे करायचे. त्यानंतर परवेज पटेल स्वत:च्या दुकानातून त्यांची विक्री करायचा, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

न्यायालयाने चौघांनाही २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. यातील परवेट पटेल हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. सांगली, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यातून ट्रकसह अन्य वाहने त्यांनी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस निरीक्षक राजन माने, उपनिरीक्षक अंतम खाडे, हवालदार अशोक डगळे, नीलेश कदम, संतोष अस्वले, संतोष कुडचे, उदय साळुंखे, संदीप पाटील, अझरुद्दीन पिरजादे, सचिन कनप, चेतन महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.वाहनांच्या २१ चेसीस सापडल्याअटकेतील टोळीकडून एक डम्पर, एक ट्रक, तीन ट्रकची इंजिन, डिझेल टाक्या, दोन स्टेअरिंग, एक बॅटरी, गॅस टाकी, गॅस कटर असा २२ लाखांचा माल जप्त केला आहे. तसेच वाहनांच्या कट केलेल्या २१ चेसीस सापडल्या आहेत. यावरुन त्यांनी सध्या तरी २१ वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. या वाहनांच्या चेसीसवरुन त्यांच्या मालकांचा शोध सुरु आहे. ज्यांची वाहने चोरीला गेली आहेत, त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील ०२३३-२६७२८५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक राजन माने यांनी केले आहे.सांगलीत शुक्रवारी वाहने चोरणाºया टोळीकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने वाहने जप्त केली.