शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त-- केंद्र शासनाकडून घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:49 IST

सांगली : केंद्र शासनाने सांगली महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त म्हणून जाहीर केले आहे.

ठळक मुद्दे आणखी एक मानाचा तुरा; विविध प्रकल्पांसाठी निधीचा मार्ग मोकळागेल्या आठवडाभरात ६८ जणांवर अशी कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाखाचा दंडवैयक्तिक शौचालये बांधण्याकडे नागरिकांचा कल वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : केंद्र शासनाने सांगली महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, केंद्र शासनाकडून विविध प्रकल्पांसाठी निधी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासन, पदाधिकाºयांनी केलेल्या परिश्रमावर केंद्र शासनानेही शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांगली महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. चार महिन्यांपूर्वी राज्यस्तरीय समितीने सांगली महापालिकेची पाहणी करून हागणदारीमुक्त शहराची घोषणा केली होती. त्यानंतर राज्य शासनाने केंद्र शासनाकडेही शिफारस केली. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय समितीचे रवी रंजन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महापालिकेची पाहणी करून अहवाल शासनाला सादर केला होता. शुक्रवारी केंद्र शासनाकडून हागणदारीमुक्त शहरात सांगली महापालिकेचा समावेश झाल्याचे जाहीर करण्यात आले.

वैयक्तिक शौचालय योजनेलाही गती देण्यात आली. महापालिकेने ४३६६ अर्जाना मंजुरी दिली होती. त्यापैकी ३ हजार ५८८ शौचालयांचे बांधकाम सुरू होते, तर ३ हजार १९९ शौचालये पूर्ण झाली होती. शौचालयांच्या लाभार्थ्यांना ४ कोटी २६ लाख रुपयांचे अनुदानही वाटप करण्यात आले आहे. शौचालय उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून १२ हजाराचे अनुदान मिळत होते, तर महापौर हारूण शिकलगार यांनी महापालिकेच्यावतीने आणखी ५ हजाराच्या अनुदानाची घोषणा केली होती. त्यामुळे वैयक्तिक शौचालये बांधण्याकडे नागरिकांचा कल वाढला होता.जनजागृतीबरोबरच कारवाईचा बडगा...प्रबोधन, जनजागृती, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय उभारणीला चालना, तसेच उघड्यावर शौचास जाणाºयांविरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत महापालिकेने निर्धारित वेळेत हागणदारीमुक्तीचे ध्येय गाठले आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून हागणदारीमुक्त शहरासाठी पाठपुरावा सुरू केला होता. उपायुक्त सुनील पवार व आरोग्य विभागाचे अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, कर्मचाºयांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.सई ताम्हणकर स्वच्छतादूत...स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने स्वच्छता दूत म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिची निवड केली होती. सई ताम्हणकर हिने तीन दिवस शहराच्या विविध भागात जाऊन स्वच्छतेबाबत जागृती केली होती. त्यानंतर प्रशासनाने प्रभागनिहाय गुडमॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावर शौचास बसणाºयांवर कारवाईचा बडगा उगारला होता. गेल्या आठवडाभरात ६८ जणांवर अशी कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाखाचा दंडही वसूल केला.