शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

सांगली बाजार समितीत बदलाचे वारे

By admin | Updated: October 10, 2016 00:40 IST

घडामोडींना वेग : इच्छुकांची छुपी मोर्चेबांधणी; २० तारखेपर्यंत विद्यमान पदाधिकारी राजीनामा देणार ?

शरद जाधव ल्ल सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदाधिकारी बदलाच्या चर्चेने वेग घेतला आहे. सत्ताधारी गटाचे नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याने येत्या २० तारखेपर्यंत त्यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सत्ताधारी गटात दिग्गज नेत्यांचा सहभाग असल्याने त्यांच्या समर्थकांनी सभापती, उपसभापतीपद मिळविण्यासाठी नाव पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे. सभापती पदासाठी सध्या तरी विशाल पाटील गटाचे अनुभवी सदस्य अण्णासाहेब कोरे, पतंगराव कदम गटाचे प्रशांत शेजाळ आणि अजितराव घोरपडे गटाचे दीपक शिंदे यांची नावे आघाडीवर असली तरी, नेतेमंडळी ऐनवेळी कोणता निर्णय घेतात, यावर बाजार समितीतील पदाधिकारी निवडीची प्रक्रिया अवलंबून आहे. तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मोठ्या संघर्षाने पार पडली होती. त्यानंतर सर्व शक्यतांना धक्के देत माजी मंत्री पतंगराव कदम, अजितराव घोरपडे, खा. राजू शेट्टी, विशाल पाटील आदींचे नेतृत्व असलेल्या पॅनेलने बाजी मारली होती. सभापती पदासाठी पहिल्या टर्मसाठी जत तालुक्याला संधी देण्यात आली होती. सत्ताधारी गटाच्या अलिखित अजेंड्यानुसार वर्षाला पदाधिकारी बदल करावयाचा असल्याने, विद्यमान सभापती संतोष पाटील व उपसभापती जीवन पाटील यांना राजीनामा देण्याचे आदेश गटाचे नेते पतंगराव कदम यांनी दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नवीन पदाधिकारी निवडीत आपल्याला संधी मिळावी, यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संचालक मंडळातील अनुभवी अण्णासाहेब कोरे यांनी दावेदारी बळकट करीत, यावेळी सभापतीपद मिळावे यासाठी प्रयत्न चालविले आहेत. गेल्यावर्षी सभापती निवडीवेळीच सत्ताधारी गटाचे नेते कदम यांनी, पुढीलवेळी संधी दिली जाईल, असा शब्द दिल्याचे कोरे यांनी सांगितले. याशिवाय समाजकारणाचा आणि एकनिष्ठपणे कॉँग्रेसमध्ये ३० वर्षाहून अधिक अनुभव असल्याने संधी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्याने, विशाल पाटील गटाला सभापतीपद दिल्यास कोरे यांचे नाव निश्चित असेल. सभापती पदाच्या अन्य दावेदारांपैकी घोरपडे गटाचे निष्ठावान सदस्य असलेले दीपक शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. मिरज पूर्व भागातील घोरपडे गटाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यात शिंदे यशस्वी ठरल्याने नेत्यांच्या चर्चेत सभापतीपद घोरपडे गटाच्या पदरात पडल्यास शिंदे यांचा विचार होणार आहे. अनुभवी सदस्य म्हणून तानाजी पाटील यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. सभापती पदाच्या अन्य दावेदारांपैकी कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रशांत शेजाळही सभापती पदासाठी दावेदार आहेत. मात्र, सध्या सभापतीपद कदम गटाकडे असल्याने शेजाळ यांनी राजीनामा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यांच्याबरोबरच इतरही सदस्य इच्छुक आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सत्ताधारी गटाला अनुकूल वातावरण करण्यासाठी सभापती निवडी करताना नेत्यांचा कस लागणार आहे. मध्यंतरी ढिली झालेली सत्ताधारी गटाची मोट एकत्र बांधण्यासाठीही नेत्यांची कसोटी लागणार आहे. निवडी : दिवाळीपूर्वी बाजार समितीतील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले असले तरी, २० तारखेपर्यंत यावर निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर आठवडाभरातच दिवाळी असल्याने, सभापती पदासाठी इच्छुक असलेल्यांनी, दिवाळीपूर्वीच निवडी होण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.