शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक मोर्चासाठी सांगली ‘मराठा’मय

By admin | Updated: September 25, 2016 23:50 IST

तयारी अंतिम टप्प्यात : पायाला भिंगरी लावून कार्यकर्ते राबताहेत; मराठा क्रांती मोर्चाचा गजर

सांगली : मंगळवार, दि. २७ सप्टेंबरला सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनाची जय्यत तयारी सुरू आहे. मोर्चाला अवघे दोन दिवस उरल्याने, जिल्ह्यात सर्वत्र नियोजनाच्या बैठकांनी वेग घेतला आहे. या विराट मोर्चासाठी सर्व भागातून राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी महिला प्रतिनिधी, स्वयंसेवकांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. सांगलीतील मोर्चाच्या नियोजनावर प्रशासनही लक्ष ठेवून असून, प्रशासकीय पातळीवरही स्वच्छता, पाण्याची सोय, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजन बैठकांनी गेला पंधरवडा अक्षरश: ढवळून निघाला आहे. जिल्हा संपर्क कार्यालयाबरोबरच तालुका आणि गावपातळीवरही बैठका, वाहनांची सोय, त्यांच्या अल्पोपहाराची सोय आदींचे नियोजन करण्यात येत आहे. मोर्चाची सुरूवात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून होणार असून, राम मंदिर चौकात समारोप होणार आहे. सध्या या मार्गावरील स्वच्छता, दिवाबत्तीची सोय, या मार्गावरील वाहने, रूग्णवाहिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. रविवारी दिवसभर राम मंदिर चौक ते कॉँग्रेस भवन चौक, राम मंदिर चौक ते पुष्पराज चौक या रस्त्यावरील ध्वनिक्षेपक यंत्रणेचे काम पूर्ण करून सायंकाळी याची चाचणी घेण्यात आली. पुष्पराज चौक ते मार्केट यार्ड व विश्रामबागपर्यंत ही सोय करण्यात येणार आहे. विक्रमी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानेही जोरदार तयारी केली आहे. रविवारी दिवसभर पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी करून यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सायंकाळी महापौर हारूण शिकलगार यांनीही संपर्क कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला. (प्रतिनिधी) मोर्चाची सुरूवात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून सकाळी ११ वाजता होणार आहे. मोर्चात अग्रभागी मुली असणार असून, त्यानंतर महाविद्यालयीन तरूणी, महिला असा क्रम आहे. निवडलेल्या पाच मुली शास्त्री चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मारूती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असून, नंतर त्या मोर्चात सहभागी होणार आहेत. तीन ठिकाणी हेलिकॅमची यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे.