शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली भूविकास बँका ‘सलाईन’वर...

By admin | Updated: August 18, 2014 23:25 IST

कर्मचारी चिंतेत : शासनविरोधात आंदोलनाची तयारी

अविनाश कोळी - सांगली --राज्यातील भूविकास बॅँकांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रस्तावाबाबत राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने राज्यातील सक्षम व आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या सर्वच बॅँका ‘सलाईन’वर आहेत. समितीच्या सकारात्मक शिफारसींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये जागृत झालेली आशा आता निराशेत रूपांतरित झाली आहे. त्यामुळे शासनविरोधी आंदोलनाची तयारी कर्मचारी संघटनेने सुरू केली आहे. राज्यातील भूविकास बँकांच्या अस्तित्वाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून उपस्थित होत आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या राज्यातील या बँकांबाबत दोनवेळा अभ्यास समिती नियुक्त झाली. पहिल्या समितीने दिलेल्या शिफारसी या बँकांसाठी सकारात्मक नव्हत्या. त्यामुळे त्या अहवालाविरुद्ध कर्मचाऱ्यांची नाराजी होती. त्यामुळे दुसरी अभ्यास समिती नेमण्यात आली. या समितीने सहकार विभाग व राज्य शासनाला आपला अहवाल सादर केला आहे. सध्याच्या अहवालाबाबत संघटना सकारात्मक आहे. समितीतही संघटनेला स्थान देण्यात आले होते. त्यामुळे समितीच्या शिफारशींवर तातडीने निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.  यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत पुनरुज्जीवनाबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यातील भूविकास बॅँकांना पुन्हा ‘सलाईन’वर ठेवण्यात आले आहे. राज्य शासनाने नाबार्डला शिखर बँकेच्यावतीने ७२७ कोटी ६३ लाखांच्या कर्ज परतफेडीसाठी हमी दिली होती. कर्ज, त्यावरील व्याज, जादा व्याज किंवा त्यावरील शुल्क याच्या परतफेडीसाठीची ही हमी होती. शासनास शिखर बँकेने देय असलेल्या रकमांची गोळाबेरीज १ हजार ७९७ इतकी नमूद करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूस शिखर बँक व जिल्हा बँकांची मालमत्ता, जिंदगी, दायित्व अशा सर्व गोष्टींची गोळाबेरीज १२९९ रुपये इतकी होते. शासनकर्ज भागविण्यासाठी ४९१ कोटी रुपये कमी पडत आहेत. कर्मचारी संघटनेने एकरकमी परतफेड योजनेबद्दल एक मुद्दा मांडला आहे. राज्य शासनाने नाबार्डकडून एकरकमी परतफेड योजना घेताना बँकेस सहभागी करून घेतले नाही. शासनाने नाबार्डच्या कर्जास हमी दिली असल्याने हमीपोटी दिलेली रक्कम शासनाने बँकेस अल्पमुदत कर्जरूपाने दिल्याचे संघटनेला मान्य नाही. कर्जाबाबत आवश्यक ती कागदपत्रे (दस्तऐवज) करून शासनाने दिलेली रक्कम कर्ज म्हणून मान्य नसल्याचे कर्मचारी प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले आहे.कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीतशिखर बँक व जिल्हा बँकांची मालमत्ता विचारात घेता, यातून ७२२ कोटी सॉफ्ट लोन म्हणून मान्य केल्यास एकत्रितरित्या शासनाची देणे रक्कम ८२३ कोटी ४७ लाख इतकी होते. ती भागवून बँक २३० कोटी ११ लाखाने फायद्यात येऊ शकेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे समितीने सुचविलेल्या या शिफारशींबाबत शासनाकडून कर्मचाऱ्यांना आशा होती. शासनाने या शिफारशींबाबत विचार न केल्यामुळे कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत.