शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भरधाव मोटारीने चार वाहनांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 13:56 IST

भरधाव वेगाने मोटारीने धडक दिल्याने दोन चारचाकी व दोन दुचाकी वाहनांच चक्काचूर झाला. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास धामणी रस्त्यावरील आशिर्वाद धाब्याजवळ घडली. या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी नरेन उत्तम शिंदे (रा. बुधगाव) याच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देसंशयित शिंदे याच्या मोटारीची सुतार यांच्या चारचाकीला जोराची धडकमोटार पाचफुट फरफटत जाऊन दोन दुचाकीवर आदळलीसुतार यांच्या मोटारीखाली अडकून स्कुटीचा चक्काचूर अपघातात पाचजण जखमी, शिंदे याच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा एअरबॅगमुळे जिवीतहानी टळली

सांगली, दि. 20 :: भरधाव वेगाने मोटारीने धडक दिल्याने दोन चारचाकी व दोन दुचाकी वाहनांच चक्काचूर झाला. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास धामणी रस्त्यावरील आशिर्वाद धाब्याजवळ घडली. या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी नरेन उत्तम शिंदे (रा. बुधगाव) याच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जखमी झालेल्यामध्ये अजय मोहन शिंदे (वय ३५, रा. सह्याद्रीनगर, सांगली), गणेश विजय चव्हाण (वय ३३, रा. विनायकनगर, हरिपूर), विनोद लक्ष्मण माने (४५, रा. बुधगाव), जावेद भालेचंद समलेवाले (४०, रा. बुधगाव), संतोष मोहन खोबरे (४१, रा. शिरवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रमोद अशोक सुतार (४३, रा. शिवकॉम्पलेक्स, गुलमोहर कॉलनी, सांगली) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित नरेन शिंदे हा कोल्हापूर रस्त्यावरून धामणीकडे मोटारीने (एमएच१३, एसी ५९६६)ने भरधाव वेगाने निघाला होता. आशिर्वाद धाब्याजवळ फिर्याद प्रमोद सुतार हे मित्रासमवेत जेवणासाठी आले होते. त्यांनी आपली चारचाकी वाहन (एमएच १०, बीए ४५९३) रस्त्याकडे पार्क केले होते. त्यांच्या वाहनामागे थोड्या अंतरावर अजय शिंदे याची मोटार (एमएच १०, बीए २५४७) होती.

संशयित शिंदे याच्या मोटारीने सुरूवातीला सुतार यांच्या चारचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे सुतार यांची मोटार पाचफुट फरफटत जाऊन धाब्याजवळ पार्क केलेल्या दोन दुचाकीवर आदळली. त्यापैकी एक स्कुटी सुतार यांच्या मोटारीखालीच अडकून तिचा चक्काचूर झाला. सुतार यांच्या मोटारीला धडक दिल्यानंतर शिंदे याचे वाहन अजय शिंदे यांच्या वाहनाला ठोकरून जवळ असलेल्या म्हसोबा मंदिरावर जाऊन उलटली.

यावेळी अजय शिंदे व गणेश चव्हाण हे त्यांच्या मोटारीजवळच थांबले होते. समोरील वाहनाचा ठोकरून शिंदे याची मोटार त्याच्या दिशेने आल्याने दोघांची पळापळ झाली. या ते दोघेजण जखमी झाले. उर्वरित तिघे जखमी नरेन शिंदे याच्या मोटारीतील असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

या विचित्र अपघातात तीनही मोटारीसह दोन दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नरेन शिंदे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक केलेली नाही. 

एअरबॅगमुळे जिवीतहानी टळली

नरेश शिंदे याची मोटार भरधाव वेगाने होती. दोन मोटारीला धडकून त्याची मोटार मंदिरावर उलटली. त्याच्या मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. अपघातस्थळापासून दूरवर मोटारीचे पार्ट पडले होते. शिंदे याच्या मोटारीतील एअरबॅग वेळेवर उघडल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तसेच इतर दोन मोटारीत कोणी नसल्याने मोठा प्रसंग टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.