शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:03 IST

सांगली : वसंतदादा साखर कारखाना सुरू केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडणाऱ्या सभासदास दुसºया सभासदाने विरोध दर्शविल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत गदारोळ झाला. बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांचे भाषण सुरु असतानाच हा ठराव मांडण्यावरून गोंधळ झाला. त्यानंतर अध्यक्ष पाटील यांनी शांत राहण्याचे आवाहन केले, मात्र सभासद संतप्तच असल्याने अखेर खा. ...

सांगली : वसंतदादा साखर कारखाना सुरू केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडणाऱ्या सभासदास दुसºया सभासदाने विरोध दर्शविल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत गदारोळ झाला. बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांचे भाषण सुरु असतानाच हा ठराव मांडण्यावरून गोंधळ झाला. त्यानंतर अध्यक्ष पाटील यांनी शांत राहण्याचे आवाहन केले, मात्र सभासद संतप्तच असल्याने अखेर खा. संजयकाका पाटील यांनी सभासदांना, कुणी दमबाजीची भाषा वापरून शहाणपणा करू नये, असा इशारा देताच तणाव निवळला.दरम्यान, बॅँकेला अडचणीतून बाहेर आणण्यात यशस्वी झालो असून वसंतदादा कारखान्याच्या करारामध्ये काहीही आक्षेपार्ह झाले नसून काहीजण विनाकारण हा विषय लावून धरत असल्याचे सांगत बँकेच्या ‘व्हिजन २०१९’मध्ये ६ हजार कोटींचे उद्दिष्ट असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ९१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी वसंतदादा सभागृहात अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खा. संजयकाका पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.अध्यक्ष पाटील यांनी प्रास्ताविक करून सभेच्या कामकाजास सुरूवात केली. यावेळी, वसंतदादा कारखाना भाडेत्त्वावर देऊन त्याबाबतचा करार करण्यात आला आहे. करारात कोणताही गोेंधळ नसल्याबाबतचे स्पष्टीकरण ते देत होते. यावेळी अचानकच धनगाव (ता. पलूस) येथील सभासद नंदकुमार साळुंखे यांनी, शेतकरी आणि सभासदांच्या हिताचा विचार करुन कारखाना सुरु केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. यावर अध्यक्षांचे भाषण सुरु असताना अभिनंदनाचा ठराव मांडता येणार नसल्याचे सांगून, बोरगाव (ता. वाळवा) च्या तानाजी पाटील यांनी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकवेळी पाटील हे आपले म्हणणे मांडत असल्याने उपस्थित काही सभासदांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. गोेंधळातही पाटील यांनी ठरावाला माझा विरोध कायम राहणार असल्याचे सांगितल्याने काही सभासद त्यांच्या अंगावर धावून गेले. यात अध्यक्षांनी हस्तक्षेप करून, गोंधळ करू नका प्रत्येकाच्या शंकांचे उत्तर दिले जाईल असे सांगितले. तरीही गोंधळ सुरूच राहिला. अखेर खा. संजयकाका पाटील यांनी उभे राहत, सभा शांततेत सुरू असून कोणीही दमबाजीची भाषा करून शहाणपणा करू नये असे म्हणताच, सर्वजण शांत झाले व त्यानंतर सभा पुन्हा सुरळीत सुरू झाली.प्रभारी कार्यकारी संचालक एम. बी. रामदुर्ग बॅँकेचा आढावा मांडत असताना पुन्हा एकदा तानाजी पाटील यांनी हस्तक्षेप करत आपले म्हणणे मांडले. यावर काही सभासद पुन्हा एकदा आक्रमक झाल्यानंतर खा. पाटील यांचा पारा पुन्हा चढला. ही बॅँकेची सभा आहे. इतरांनी शहाणपणा करू नये. सभासदांना प्रश्न मांडण्याचा हक्क आहे. इतरांनी काय बांगड्या भरल्या आहेत काय? असा सवाल करत, गंमत करायला पाच मिनिटे लागणार नाहीत, असे सुनावताच पुन्हा सभा सुरळीत सुरू झाली.अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले की, वसंतदादा कारखाना करारातून बँकेचे चारशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबाबतचा आरोप चुकीचा आहे. बँकेची कारखान्याकडे ६३.६८ कोटी रुपयांची थकबाकी होती. या थकबाकीपोटी कारखाना ताब्यात घेऊन त्याची मालमत्ता न विकता तो भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या लेखापरीक्षणात काही त्रुटी लक्षात आणून देण्यात आल्या असून त्या दुरुस्त करण्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या सूचनेनुसारच करारात दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे विनाकारण कोणीही बॅँकेची बदनामी करू नये.यावेळी संग्रामसिंह देशमुख, आ. मोहनराव कदम, विशाल पाटील, सी. बी. पाटील, महेंद्र लाड, विक्रम सावंत, प्रतापराव पाटील, उदयसिंह देशमुख, गणपती सगरे, चंद्रकांत हाके, बाळासाहेब होनमोरे, श्रद्धा चरापले, कमल पाटील, डी. के. पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक एम. बी. रामदुर्ग, सरव्यवस्थापक मानसिंग पाटील, उपव्यवस्थापक जे. जे. पाटील यांच्यासह सभासद, शेतकरी उपस्थित होते.