शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

सांगलीत फसवा इराक इफेक्ट!

By admin | Updated: June 24, 2014 01:20 IST

पेट्रोलपंपांवर गर्दी : पंप बंद होण्याच्या अफवेने पळापळ

सांगली : इराकमध्ये युध्दाचा भडका उडाल्याने भारतातील पेट्रोलसाठा संपणार असून, पुढील चार ते पाच दिवस पेट्रोलपंप बंद राहणार असल्याचा संदेश व्हॉटस्-अ‍ॅपवरून काल (रविवारी) सायंकाळी सर्वत्र पसरला आणि एकच लगबग सुरू उडाली. जो तो सुसाट वेगाने पेट्रोलपंपांच्या दिशेने निघाला, परिणामी पेट्रोलपंपावर रांगाच रांगा दिसू लागल्या. पेट्रोलपंपचालकही अचानक रांगा लागल्याने बुचकळ्यात पडले; परंतु तो ‘फसवा इराक इफेक्ट’असल्याचे समोर आले. वाहनचालकांना सांगूनही कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आजही (सोमवारी) दुपारपर्यंत बऱ्याचशा पंपांवर पुन्हा रांगा लागल्या होत्या.मागील काही दिवसांपासून तेलाच्या विहिरी असलेल्या इराकमध्ये युध्दजन्य परिस्थिती असल्याने पेट्रोलची टंचाई जाणवणार किंवा पेट्रोलच्या किमती वाढणार, याची चर्चा होती; परंतु त्याचा परिणाम प्रत्यक्षात जाणवत नव्हता. रविवारी सायंकाळी व्हॉटस्-अ‍ॅपवरून इराक इफेक्टमुळे पेट्रोलपंप पाच दिवस बंद राहणार असल्याचा संदेश सर्वत्र पसरला. नागरिकांनीही कोणतीही खातरजमा न करता ‘सामाजिक कर्तव्या’च्या भावनेतून तो अनेकांना शेअर केला आणि घोळ झाला. पेट्रोल संपणार, या दोन शब्दांनी हबकलेले अनेक वाहनचालक पेट्रोलपंपांकडे भरधाव वेगाने निघाले आणि काही वेळातच सर्वच पंप गर्दीने फुलून गेले. ज्यांना संदेश मिळाला नाही, त्यांना काहीच समजेना. कदाचित पेट्रोलच्या किमती वाढणार असतील, या हेतूने त्यांनीही पेट्रोलपंपांवरील गर्दीत उभे राहणे पसंत केले!पेट्रोलपंप मालकांनी नक्की काय झाले, याची चौकशी करून वाहनधारकांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. परंतु कोणताच वाहनचालक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. विशेष म्हणजे प्रत्येकाने नेहमीपेक्षा जादा पेट्रोल भरण्यास प्राधान्य दिले. रात्री अकरानंतरदेखील वाहनचालकांची गर्दी हटत नव्हती. अखेर पंप बंद झाल्याने नाईलाजाने अनेकांना घरी परतावे लागले. परंतु पुन्हा सकाळपासून रांगा लागल्याचे दिसत होते. काहींना ही अफवा असल्याचे समजल्याने रांगेत उभे राहण्याचे टाळले. दिवसभर शहरात चर्चा मात्र पेट्रोलपंपांवरील रांगांचीच होती. (वार्ताहर)