शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत सिलिंडरचा साठा जप्त

By admin | Updated: August 15, 2014 00:21 IST

एकास अटक : घरमालक फरार; इलेक्ट्रिक मोटारीद्वारे भरून विक्री

सांगली : बेकायदा सिलिंडरचा साठा करून त्यामधील गॅस इलेक्ट्रिक मोटारीच्या मदतीने काढून तो अन्य सिलिंडरमध्ये भरून देणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज, गुरुवार सायंकाळी पर्दाफाश केला. टोळीचा मुख्य सूत्रधार शाहरुख मकसूद सनदी (वय २१, रा. खणभाग, म्हसोबा गल्ली, सांगली) याला अटक केली आहे. कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात ही कारवाई करण्यात आली. सिलिंडरचा साठा सापडलेल्या खोलीचा मालक शब्बीर अथणीकर हा असून, तो या कारवाईची चाहूल लागताच फरार झाला आहे. घरगुती, व्यावसायिक असे एकूण ५० सिलिंडर, चार इलेक्ट्रिक मोटारी, दोन रेग्युलेटर, वजनकाटा असा माल जप्त करण्यात आला आहे. खतीब हा गेल्या दोन वर्षांपासून सिलिंडरमधील गॅस काढून तो ग्राहकांच्या रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून देण्याचा व्यवसाय करीत होता. यासाठी त्याने शिवशंभो चौकातील शब्बीर अथणीकर यांची खोली भाड्याने घेतली होती. अथणीकर यांचे दुमजली घर आहे. तळघरातील एका लहान खोलीत त्याचा व्यवसाय सुरू होता. या खोलीपर्यंत जाण्यासाठी अडगळीचा रस्ता आहे. यामुळे कुणालाही संशय येत नव्हता. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांना या बेकायदेशीर व्यवसायाची माहिती मिळाली होती. त्यांनी गुन्हे अन्वेषणला कारवाईचे आदेश दिले होते. /प्त्यानुसार सायंकाळी सहा वाजता पोलिस पथकाने छापा टाकला. या छाप्यात घरगुती वापराचे ३९ सिलिंडर सापडले. यामध्ये सात सिलिंडर भरलेले आहेत. व्यावसायिक ११ सिलिंडर असून, एक भरलेला आहे. इलेक्ट्रीक मोटारीच्या मदतीने भरलेल्या सिलिंडरमधील गॅस मोकळ्या सिलिंडरमध्ये भरून दिला जात होता. यासाठी चार इलेक्ट्रीक मोटारी होत्या. त्याही जप्त केल्या आहेत. या कारवाईची माहिती मिळताच जिल्हा पुरवठा विभागातील अन्न-धान्य वितरण अधिकारी विलास डुबल यांचे पथक दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. खोलीचा मालक अथणीकर याचा शोध घेण्यात आला; मात्र तो फरारी झाला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी) अथणीकर यांना माहिती असूनही त्यांनी खतीबला सिलिंडरचा साठा करण्यासाठी खोली भाड्याने दिल्याचे निष्पन्न झाले आहे. तो केवळ साठाच करीत नव्हता, तर सिलिंडरमधील गॅस काढून मोकळ्या सिलिंडरमध्ये भरून द्यायचा. या खोलीभोवती तीस ते पस्तीस लोक राहतात. एखादी दुर्घटनाही घडू शकली असती. तरीही तेथील लोकांनी पोलिसांत कधी तक्रार करण्याचे धाडस दाखविले नाही. सिलिंडरचा काळाबाजार करणारी मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. खतीबकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेले सिलिंडर आले कोठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जप्त करण्यात आलेले सिलिंडर विविध गॅस कंपन्यांचे आहेत. खतीबची कसून चौकशी सुरू आहे.- विश्वनाथ घनवट, निरीक्षक