शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

सांगलीत तरुणास दगडाने ठेचले

By admin | Updated: April 14, 2015 00:56 IST

गंभीर जखमी : चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

सांगली : बिअर शॉपीत बिअर पिताना झालेल्या वादातून एका तरुणाला डोके दगडाने ठेचून गंभीर जखमी करण्यात आले. अभिजित बापूसाहेब पाटील (वय ३०, रा. वृंदावन व्हिला, स्फूर्ती चौक, विश्रामबाग) असे जखमीचे नाव आहे. शंभरफुटी रस्त्यावरील फेडरल बँकेसमोर रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन संभाजी बनसोडे (रा. इनामधामणी, ता. मिरज), योगेश विलास भोरे (रा. हसनी आश्रम) व दोन अनोळखी (अद्याप नावे निष्पन्न नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. जखमी अभिजित पाटील याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने प्रकृतीचा धोका टळला आहे. तो शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब घेऊन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयितांच्या शोधासाठी सोमवारी दुपारी त्यांच्या घरावर छापे टाकले. मात्र घटनेनंतर ते फरारी झाल्याची माहिती मिळाली. अभिजित पाटील व संशयित हे मित्र आहेत. ते शंभरफुटी रस्त्यावरील एका बिअर शॉपीत बिअर पिण्यासाठी गेले होते. तिथे त्यांचा बिल देण्यावरुन वाद झाला होता. हा वाद मिटलाही होता. त्यानंतर ते चालत फेडरल बँकेजवळ आले. तिथे त्यांच्यात पुन्हा वाद सुरु झाला. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. संशयितांनी अभिजितला शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला खाली पाडून त्याचे डोके दगडाने ठेचण्यात आले. तो रक्तबंबाळ होताच संशयितांनी तेथून पलायन केले. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. रस्त्यावरील लोकांची भीतीने पळापळ झाली. (प्रतिनिधी)