शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत काँग्रेसचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा वेशीवर टांगणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा वेशीवर टांगणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कमिटीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचा खरा चेहरा आता समोर आला असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपवर केला.अर्णब गोस्वामी यांच्यावर कडक कारवाई व्हावी, यासाठी राज्यभर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सांगलीतही आंदोलन झाले. पृथ्वीराज पाटील म्हणाले, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवादामध्ये अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील माहिती गोस्वामी यांच्याकडे कशी आली? यावरून गोस्वामी यांचे पंतप्रधान, गृहमंत्री व भाजप सरकारकडील मंत्र्यांशी निकटचे संबंध असल्याचे स्पष्ट होते. गोपनीयतेचा भंग करत हा देशद्रोहाचा प्रकार गोस्वामी यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. शिवाय भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर केला आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे.

या आंदोलनात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, नामदेवराव मोहिते, नगरसेवक फिरोज पठाण, बिपीन कदम, रवी खराडे, विजय आवळे, अण्णासाहेब पाटील, शीतल सदलगे, अशोकसिंह रजपूत, संतोष भोसले, आकाश शेंडे आदी काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.