शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील विविध भागांत घरफोडी करणाऱ्या चारजणांच्या टोळीस स्थ‌ानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील विविध भागांत घरफोडी करणाऱ्या चारजणांच्या टोळीस स्थ‌ानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीकडून शहरातील विविध भागात करण्यात आलेल्या दहा घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले असून, अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.

अटक केलेल्या संशयितांमध्ये अतिरेकी ऊर्फ आकाश श्रीकांत खांडेकर (वय २२, रा. राणाप्रताप चौक, सांगलीवाडी), अक्षय धनंजय पोतदार ( २०, रा. मालगाव रोड, सुभाषनगर), विजय संजय पोतदार (२३, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) व रोहित गणेश माळी (२० रा. हरिपूर रोड, सांगली) यांचा समावेश आहे. अटक केलेले सर्वजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

जिल्ह्यातील घरफोडी, चोरीचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पथक गस्तीवर असताना, काळीवाट रोडवर शेतात असलेल्या एका पडक्या पोल्ट्रीजवळ रेकॉर्डवरील गुन्हेगार अतिरेकी ऊर्फ अक्षय खांडेकर व त्याच्या साथीदारांमध्ये पैशावरून वाद सुरू असल्याची माहिती पथकातील संतोष गळवे यांना मिळाली. पथक ति‌थे गेले असता, चौघेजण आढळून आले व त्यांच्याजवळील सॅकमध्ये सोन्या-चांदीचे दागिने, घडयाळे, रोख रकमेसह असा तीन लाख ६३ हजार १०३ रुपयांचा मु्द्देमाल मिळाला.

संशयितांनी गेल्या तीन महिन्यांत चोऱ्या केल्या आहेत. यात वखारभाग येथील पंजाबी स्पेअरपार्टच्या दुकानापाठीमागे असलेल्या अपार्टमेंटमधील फ्लॅट, रेल्वे ब्रिजजवळील आरवाडे पार्कमधील बंगला, शामरावनगर येथील घर, यशवंतनगर आंबा चौकाजवळील बंगला, विनायकनगर येथील घर, यशवंतनगर येथील पदमावती मंदिर, माधवनगर कत्तलखान्याजवळील घर, रमामातानगर येथील घर आणि आकाशवाणी केंद्राजवळील घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरल्याचे सांगितले.

दरम्यान, यापुढेही गुन्हेगारांवरील कारवाई अधिक कडक करणार असल्याचे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.

यावेळी अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहा. निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.