शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला

By admin | Updated: January 6, 2017 15:33 IST

सांगलीजवळील भिलवडी येथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडला आहे.

ऑनलाइन लोकमत
भिलवडी (ता. पलूस), दि. ६ -  येथे चोपडे मळ्याजवळ अनुजा आनंदराव शिंदे (वय १૪) या शाळकरी मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडला आहे.  मृत्यूच्या कारणाबाबत विविध शक्यता वर्तविल्या जात असून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
आज शुक्रवार दि. ६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास हा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. संबंधितांनी भिलवडी पोलिसांत याबाबत माहिती कळवली. भिलवडी पोलिसअधीक्षक ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत पोलिस व नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी,  ही मुलगी माळवाडी येथील चव्हाण प्लॉटमध्ये राहत होती. ती सेकंडरी स्कूल भिलवडीमध्ये आठवीत शिकत होती. चार वर्षापूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आई व बहिणीसह राहत होती. तिची आई सूतगिरणीमध्ये नोकरीस आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मुलींचा सांभाळ करीत आहे. गुरुवारी रात्री अनुजा व तिची आई या दोघींची जोरदार भांडणे झाली. त्यानंतर रात्री साडेआठच्या दरम्यान ती रडत रडत घराबाहेर पडली असल्याची माहिती शेजाऱ्यांकडून मिळाली.  दरम्यान आज सकाळी भिलवडी तासगाव रस्त्यावर असणाऱ्या चोपडे मळ्यालगत तिचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासांती हृदयविकाराचा धक्का किंवा बलात्कार करून खून यापैकी एका कारणामुळे तिचा मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहेत. दुपारी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे.