शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली --सलगरे, उमदीत बुरशीनाशकावर बंदी

By admin | Updated: August 27, 2014 23:18 IST

कृषी विभागाची कारवाई : १ कोटी ६0 लाख रुपयांची औषधे जप्त

सांगली : सलगरे (ता. मिरज) येथील धानेश्वरी आणि उमदी (ता. जत) येथील गणपती कृषी सेवा केंद्रामध्ये विनापरवाना ‘बीएएसएफ इंडिया’ या कंपनीच्या एक कोटी ६० लाख किमतीच्या ‘झाम्प्रो’ बुरशीनाशकाच्या पाच हजार २८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली आहे. तेथील सर्व बुरशीनाशकांवर विक्री बंदचे आदेश दिले आहेत.बीएएसएफ इंडिया या कंपनीने तासगाव येथे विनापरवाना बुरशीनाशक उत्पादन केले होते. त्याच्या विक्रीसाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून परवाना घेणे आवश्यक होते; परंतु याकडे त्यांनी दुर्लक्ष करून उत्पादनाची बाजारात विक्री सुरू केली होती. हे बुरशीनाशक द्राक्षबागेवरील दावण्या रोगासाठी वापरले जात होते. या बेकायदेशीर उत्पादनाविषयी शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्यानंतर जिल्हा गुणनियंत्रकांनी कंपनीचे उत्पादन बंद केले होते. तरीही कृषी केंद्रातून या बुरशीनाशकाची विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्या. त्यानुसार जत पंचायत समितीमधील कृषी अधिकारी ऋषिकेश कुंभार यांनी उमदी येथील गणपती कृषी केंद्रावर छापा टाकून तेथील १ कोटी ५१ लाख ५३२ रूपये किमतीच्या ‘झाम्प्रो’ बुरशीनाशकांवर विक्री बंदीचे आदेश दिले आहेत.जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी धनाजी पाटील आणि मिरज पंचायत समितीचे अधिकारी बारावकर यांनीही बुधवारी सलगरे येथील धानेश्वरी कृषी केंद्राला भेट दिली. याठिकाणी ‘झाम्प्रो’च्या ४०० मि.लिच्या ३०० बाटल्या सापडल्या असून, त्यांची किंमत ४ लाख ८१ हजार २०० रुपये आहे. एक लिटरच्याही दीडशे बाटल्या सापडल्या असून, त्यांची किंमत ५ लाख ८८ हजार ७५० रुपये आहे. सर्व औषधांवर विक्री बंदीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)सुभाषनगरमध्ये ३४ हजारांच्या खताला विक्रीबंदीसुभाषनगर येथील गोविंद फर्टिलायझर्सला जिल्हा गुणनियंत्रक डी. एस. शिंगे यांनी बुधवारी भेट दिली. यावेळी तेथे १९:१९:१९, १३:०:४५ यासह पाच कंपनीच्या ३२५ किलो दाणेदार खताची विक्री सुरू होती. विक्रेत्याकडे खत विक्रीचा परवाना नसल्यामुळे तेथील ३४ हजार ७१५ रुपये खतावर विक्री बंदीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शिंगे यांनी दिली.