वारणावती : कोरोना महामारीच्या काळात सर्व डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी सतत कार्यरत आहेत. मागे वळून पाहताना या कठीण काळात आपले ज्ञान, कौशल्य यांचा वापर लोकांच्या भल्यासाठी, सेवेसाठी करता आला, याचेच समाधान वाटते, असे प्रतिपादन सांगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. निर्मळे यांनी येथे केले.
कोटेश्वर महिला मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न, शिराळा तालुका पत्रकार संघ यांच्यावतीने सांगाव परिसरात कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मळे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते
यावेळी सुमंत महाजन, रवींद्र कदम, विजय पाटील, अजित शिंदे, सुशीला कुरणे, नयना कुंभार, सरोजिनी कदम, संगीता खटावकर, नूतन साठे, अविनाश फातले आदी प्रमुख उपस्थित होते. अशोक कोकाटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.