शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सांगलीत एकाच कुटुंबातील सातजणांचा देहदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आईला आदरांजली व समाजाचे ऋण मृत्योत्तर फेडावेत, या भावनेतून सांगलीतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबातील सात सदस्यांनी देहदानाचा संकल्प केला. देहदानाची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करुन सर्व अर्ज मिरज शासकीय महाविद्यालयात दिले आहेत.मृत्यूनंतरच्या सर्व कर्मकांडास फाटा देऊन नवा पायंडा पाडण्याची किमया अ‍ॅड. ...

ठळक मुद्देकर्मकांडास फाटा : शासकीय महाविद्यालयात भरून दिले अर्ज पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन आईच्या मृतदेहाचे कोणत्याही विधिविना मिरजेतील डिझेल दाहिनीत दहन आईच्या लहानपणापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व छायाचित्रांचे प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आईला आदरांजली व समाजाचे ऋण मृत्योत्तर फेडावेत, या भावनेतून सांगलीतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबातील सात सदस्यांनी देहदानाचा संकल्प केला. देहदानाची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करुन सर्व अर्ज मिरज शासकीय महाविद्यालयात दिले आहेत.

मृत्यूनंतरच्या सर्व कर्मकांडास फाटा देऊन नवा पायंडा पाडण्याची किमया अ‍ॅड. शिंदे व त्यांच्या कुटुंबाने केली आहे. गेल्या आठवड्यात शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शिंदे यांचे निधन झाले. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन आईच्या मृतदेहाचे कोणत्याही विधिविना मिरजेतील डिझेल दाहिनीत दहन केले. तसेच अस्थींचे नदीत विसर्जन न करता घरच्या बागेतील आम्रवृक्षाच्या मुळाशी त्या समर्पित केल्या. तेरावा घालण्याचे टाळून स्मरण दिन आयोजित करुन, आईच्या लहानपणापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून तिच्या आठवणींना उजाळा दिला.शंभर जणांना भोजनलक्ष्मीबाई शिंदे यांच्या स्मरणदिनी शंभर निराश्रीतांना भोजन दिले. समाजाचे ऋण फेडावेत, या भावनेतून शिंदे यांचे वडील शामराव, बंधू किशोर, पत्नी शोभा, मुली निशीगंधा, दिशा, पुतण्या वैभव यांनी देहदानाचा संकल्प करून आदरांजली वाहिली.