शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

सांगलीत रविवारपासून दशरात्रोत्सवास सुरुवात

By admin | Updated: January 1, 2016 00:01 IST

विविध कार्यक्रम : मराठा सेवा संघाचे आयोजन

सांगली : मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ३ जानेवारीपासून जिजाऊ-सावित्री दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील आणि जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा हेमलता देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्यावतीने दरवर्षी जिजाऊ जयंतीनिमित्त दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी तीन जानेवारीपासून उत्सवास सुरुवात होणार आहे. रविवार, दि. ३ जानेवारीला जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. ४ जानेवारीला बचत गट प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. ५ जानेवारीला ‘नवउद्योजकांसाठी व्यवसायातील संधी’ या विषयावर समाजातील उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत. बुधवार, दि. ६ जानेवारीला गंगाधर बनबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी केडर कॅँपचे आयोजन केले आहे. ७ जानेवारीला ‘शेती : उद्योग की पारंपरिक व्यवसाय?’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. शनिवार, दि. ९ जानेवारीला वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. यात ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य’ या विषयावर पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा गटात वक्तृत्व स्पर्धा होईल. खुल्या गटासाठी ‘राजमाता जिजाऊ- एक प्रेरणा’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. रविवार, दि. १० जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मराठा वधू-वर परिचय मेळावा, तर दुपारी चार वाजता महिलांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे. मंगळवार, दि. १२ जानेवारीला जिजाऊ जयंतीदिनी दशरात्रोत्सव कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास वंदना शेखर गायकवाड, तेजस्विनी पाटील, जयश्री पाटील उपस्थित राहणार आहेत. हे कार्यक्रम सिव्हिल हॉस्पिटलच्यामागील मराठा सेवा संघाच्या भवनात होणार आहे. यावेळी डॉ. संजय पाटील, संजय देसाई, तेजस्विनी सूर्यवंशी, विजयराव भोसले, महेश घारगे, विद्या भोसले, शुभांगी साळुंखे, प्रणिता पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)