शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकांचा सांगलीत संताप-- थाळीनाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:10 IST

सांगली : महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने शनिवारी सांगलीत थाळीनाद आंदोलनातून संताप व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्देपंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची आंदोलकांकडून मागणीगणपती उत्सवसारख्या महत्त्वाच्या सणालासुध्दा मानधन मिळाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने शनिवारी सांगलीत थाळीनाद आंदोलनातून संताप व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री जर महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचे ऐकत नसतील तर मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.कृती समितीच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर कार्याध्यक्षा मंगला सराफ आणि आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. रमेश सहस्त्रबुध्दे, शौकत पठाण यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाºयांनी ११ सप्टेंबरपासून संप सुरु केला आहे. मानधनवाढीबाबत सरकारकडून चालढकलपणा सुरु आहे. सेविका आणि मदतनीसांच्या मानधनवाढीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, या समितीने सेविकांना अडीच हजार, तर मदतनीसांना अठराशे रुपयांची मानधन वाढ सुचविली आहे. हा प्रस्ताव अद्याप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला नाही. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर आणि महिला बालकल्याण मंत्री मुंडे यांच्याकडे याबाबत सातत्याने बैठका होत आहेत. परंतु त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळत नाही. मानधनवाढीबाबत मुख्यमंत्री फडणवीस महिला बालकल्याण मंत्र्यांचे ऐकत नसतील, तर मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कार्याध्यक्षा सराफ यांनी केली.

कृती समितीने बेमुदत संपाचा निर्णय कायम ठेवला असून, जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाड्या बंद आहेत. कोणत्याही शासकीय बैठकांना उपस्थित रहायचे नाही व मासिक अहवालही द्यायचा नाही, असा निर्धार करण्यात आला आहे. एक एप्रिलला दिलेल्या संपाच्या नोटिसीची दखल घेतली नाही.२० जुलैला मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. २५ जुलैला आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला; मात्र सरकारने अद्याप दखल घेतली नाही. गणपती उत्सवसारख्या महत्त्वाच्या सणालासुध्दा मानधन मिळाले नाही. अंगणवाडी कर्मचारी यांना तुटपुंज्या मानधनावर राबवण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी नाराज आहेत.

मानधन वाढीचा निर्णय झाल्याशिवाय माघार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष आनंदी भोसले, उपाध्यक्षा नादिरा नदाफ, अरुणा झगडे, कमल साळुंखे, रेखा साळुंखे, निलप्रभा लोंढे, मधुमती मोरे, वंदना सकळे, अलका विभुते, अलका माने, विजया जाधव, शुभांगी कांबळे, मंगलताई पाटील, शालन मोहिरे, विद्या कांबळे, संगीता तवरे, सुरेखा लोहार, मिनाज मुलाणी, सुहासिनी पवार, जयश्री चंदनशिवे तसेच सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या.कुपोषण वाढल्यास सरकार जबाबदार : मंगला सराफअंगणवाडी कर्मचाºयांचा संप सुरु असल्याने पोषण आहार देण्याचे काम बंद आहे. कुपोषित बालकांचा आहारही थांबला आहे. अंगणवाडीच्या किल्ल्या सेविका आणि मदतनीसांना तात्काळ देण्यात याव्यात, असे आदेश महिला बालकल्याणच्या आयुक्तांनी दिले आहेत. मात्र मानधनाचा प्रश्न सुटल्याशिवाय किल्ल्या दिल्या जाणार नाहीत. सरकारकडून अंगणवाडी कर्मचाºयांचा प्रश्न तात्काळ सुटला नाही, तर कुपोषण वाढण्याची भीती आहे. कुपोषण वाढल्यास सरकार जबाबदार राहील, असा इशाराही महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कृती समितीच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ यांनी दिला.