शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली पालिका हद्दीत ४७ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:20 IST

सांगली : महापालिका क्षेत्रातील चार प्रभाग समितींच्या कार्यक्षेत्रात ४७ हून अधिक धोकादायक इमारती आहेत. पालिकेने या धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजाविल्या आहेत.

ठळक मुद्दे♦ प्रशासनाकडून कानाडोळा ♦ भाडेकरू व मालकाच्या वादात महापालिकेला प्रतिवादी केलेले नसते♦इमारती पाडायला गेले, तर कुठे कुळाचा वाद समोर♦धोकादायक इमारत पाडून भाडेकरुला घालवायचे असते♦ नोटिसांचे कागदी घोडे सुरूच; महापालिकेच्या अतिथीगृहाची इमारतही यादीत

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका क्षेत्रातील चार प्रभाग समितींच्या कार्यक्षेत्रात ४७ हून अधिक धोकादायक इमारती आहेत. पालिकेने या धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजाविल्या आहेत. पावसाळा तोंडावर आला की, महापालिकेकडून अशा नोटिसांचे कागदी घोडे नाचविले जातात. प्रत्यक्षात कारवाई मात्र शून्य असते. खुद्द महापालिकेच्याच मालकीची अतिथीगृहाची इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहे. पण अद्याप ती पाडलेली नाही. यावरून महापालिका धोकादायक इमारतींविषयी किती गंभीर आहे, याचा प्रत्यय येतो.पावसाळा आला की, दरवर्षी धोकादायक इमारतींचा विषय चर्चेच्या पटलावर येतो. आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकांकडून धोकादायक इमारतींचा सर्व्हे केला जातो. अशा इमारतींची यादी तयार होते. इमारत मालकांना महापालिका कारणे दाखवा नोटिसा बजावते. पण प्रत्यक्षात कारवाई मात्र होत नाही. सांगली शहरातील प्रभाग समिती एक व दोनच्या कार्यक्षेत्रात ४३ धोकादायक इमारती आहेत. गेल्यावर्षीही या प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रात धोकादायक इमारतींना नोटिसा बजाविल्या होत्या. त्यापैकी चार ते पाच इमारती उतरविण्यात आल्या. इतर इमारतींबाबत न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्या तशाच उभ्या आहेत. गावभाग, वखारभाग, खणभाग, बालाजी चौक, नळभाग या गावठाण परिसरात जुन्या इमारतींची संख्या अधिक आहे.प्रभाग एकचे शाखा अभियंता आप्पा हलकुडे म्हणाले की, यंदा प्रभाग एकमधील २१ धोकादायक इमारतींना नोटिसा बजाविल्या आहेत. त्यापैकी चार ते पाच इमारती पाडल्या आहेत. इतर इमारतींबाबत न्यायालयीन वाद असल्याने कारवाई करता आलेली नाही. या इमारतीत कोणीच राहत नाही. या धोकादायक इमारती काढून घेण्यासाठी महापालिकेचा पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.कुपवाड प्रभाग समितीत यंदा एकही धोकादायक इमारत नोंद झालेली नाही. गतवर्षी कुपवाडमध्ये ६ धोकादायक इमारतींना नोटिसा बजाविल्या होत्या. या इमारती उतरवून घेण्यात आल्या आहेत. यंदा आरोग्य विभागाकडून सर्वेक्षणच झालेले नसल्याने, धोकादायक इमारतींची नोंद नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच मिरज शहरात ४ धोकादायक इमारतींना नोटिसा बजाविल्या आहेत. त्याविषयी नागरिकांनीच तक्रार अर्ज दिला आहे. गतवर्षी २२ मिळकत धारकांना नोटिसा दिल्या होत्या. त्यापैकी काही इमारती पाडण्यात आल्या, तर काही इमारतींवर न्यायप्रविष्ट बाब असल्याने कारवाई होऊ शकली नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक इमारतींची घोषणा होते. ही प्रक्रिया दरवर्षी राबविली जाते. पण त्यातून कारवाईचे प्रमाण मात्र शून्यच राहिले आहे.महापालिकेकडे धोकादायक इमारतींची व्याख्याही अद्याप स्पष्ट नाही. पावसाळ्यात कुठलीही दुर्घटना घडू नये, यासाठी अशा धोकादायक इमारती घरमालकांनी स्वत:हून पाडून घ्यायच्या असतात. यासाठी सुरुवातीला महापालिका नोटिसा बजावते.यंदा ४७ धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. या इमारती मालकांनी स्वत:हून उतरवून घ्यायच्या आहेत. पण या इमारती पाडायला गेले, तर कुठे कुळाचा वाद समोर येतो, तर कुठे भाडेकरूंचा प्रश्न असतो. अशा इमारतींबाबत मूळ मालक मात्र धोकादायक इमारत पाडण्यासाठी आग्रही असतो. पण त्यात काही न्यायप्रविष्ट बाब असेल, तर महापालिकेची कोंडी होते. पण त्यावर अद्याप प्रशासनाला पर्याय सापडलेला नाही.महापालिकेचीच : इमारत धोकादायकमहापालिकेच्या मुख्यालयासमोरील अतिथीगृहाचीच इमारत धोकादायक बनली आहे. पालिकेने या इमारतीवर तसा फलकही लावला आहे. या जागेवर बीओटीतून व्यापारी संकुल उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यासाठी या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिटही करण्यात आले. पालिकेच्या पॅनेलवरील आर्किटेक्टनेही, ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. तरीही ही इमारत उतरवून घेतली गेलेली नाही. यावरून पालिकेचे प्रशासन धोकादायक इमारतींबाबत किती गंभीर आहे, याचा प्रत्यय येतो.कोंडी प्रशासनाचीशहरातील धोकादायक इमारत पाडायला गेले, तर यातील कुळे आडवी येतात. घरमालकालाच आपली धोकादायक इमारत पाडून भाडेकरुला घालवायचे असते. यामुळे बहुतेक मालक स्वत:हून महापालिकेला पत्र देऊन धोकादायक इमारत पाडा, असे सांगतात. इमारत पाडायला जेव्हा महापालिका जाते, तेव्हा भाडेकरू न्यायालयात गेलेला असतो. भाडेकरू व मालकाच्या वादात महापालिकेला प्रतिवादी केलेले नसते. जेव्हा इमारत पाडण्यासाठी पथक जाते, तेव्हा न्यायालयीन बाबी समोर येतात. मग महापालिकेला मागे फिरावे लागते.