शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गर्भपात, नशेची औषधे आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:12 IST

सांगली : गर्भपात आणि नशेच्या औषधांची आॅनलाईन विक्री गेल्या काही दिवसात वाढली आहे. लोकांच्या जीविताशी चाललेला हा खेळ थांबविण्याची ...

सांगली : गर्भपात आणि नशेच्या औषधांची आॅनलाईन विक्री गेल्या काही दिवसात वाढली आहे. लोकांच्या जीविताशी चाललेला हा खेळ थांबविण्याची मागणी केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेने केली आहे.सांगली जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे संचालक विनायक शेटे म्हणाले, आॅनलाईन औषधविक्रीचा कायदा पूर्णत: संमत झालेला नाही, तरीही अॉनलाईन कंपन्यांच्या संकेतस्थळांवर ती खुलेआम उपलब्ध आहेत. प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देता येत नसल्याने, कंपन्यांनी बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करणारी यंत्रणा उभारली आहे. २० ते ३० टक्के डिस्काऊंटसह विक्री होते.झोपेच्या गोळ्या, सेक्सशी संबंधित औषधे, शरीरसौष्ठवाच्या गोळ्या, गर्भपात तसेच नशेची औषधे आॅनलाईन मिळतात. दुकानात प्रिस्क्रिप्शनशिवाय दिली जात नाहीत. हिशेबाचे त्रांगडे नको, म्हणून अनेक व्यावसायिक ती ठेवतच नाहीत. पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी एका कारवाईत नशेची औषधे पकडली होती. संशयितांनी ती जयसिंगपुरातील एका दुकानातून घेतल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला असता, तेथे बेकायदा औषधे आढळली. अन्न व औषध विभागाने कारवाई करत दुकान सील केले. सध्या खटला सुरु आहे. औषधांच्या गैरवापराचे व कारवाईचे हे उदाहरण समोर असल्याने, दुकानदार त्यांची विक्री शक्यतो टाळतात.हा मार्ग बंद झाल्याने त्यांचा ग्राहकवर्ग आता आॅनलाईनकडे वळला आहे. काही गोळ्या दारुमध्ये मिसळून पिल्यास अधिक नशा येते, हे लक्षात आल्याने त्यांची आॅनलाईन विक्री वाढल्याचे आढळले आहे. सांगली-मिरजेत जास्त प्रमाणात मागवली जात आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.पार्सलची संख्या : वाढलीजिल्ह्यात अॉनलाईनची पार्सल पोहोचवणाऱ्या कुरिअर यंत्रणेकडे हल्ली औषधांच्या पार्सलची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे केमिस्ट संघटनेच्या लक्षात आले. विशेषत: सांगली-मिरज शहरे व नजीकच्या गावांत त्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे.