शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

संदीप राजोबांना बेदम मारहाण

By admin | Updated: June 22, 2014 00:28 IST

गंभीर जखमी : पलूसच्या आमसभेत पालकमंत्र्यांसमोरच काँग्रेस कार्यकर्त्यांचे कृत्य; ऊसदराच्या ठरावावरून गोंधळ

पलूस/भिलवडी : पलूस पंचायत समितीच्या आमसभेत उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्याच्या ठरावाबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या कारणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत खडाजंगी झाली. त्यातूनच पंचायत समिती सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण आणि वादावादीमुळे सभा गोंधळात पार पडली. हा प्रकार पालकमंत्री पतंगराव कदम यांच्यासमोरच घडला. मारहाणीत राजोबा जखमी झाले असून, त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.पलूस पंचायत समितीची आमसभा पालकमंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज, शनिवार सकाळी साडेअकराला पंचायत समितीच्या आवारात सुरू झाली. सहा वर्षांनंतर आमसभा होत असल्याने काँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभीच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याबद्दल पालकमंत्री कदम यांच्या अभिनंदनाचा ठराव संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्रीकांत लाड यांनी मांडला. त्याला संदीप राजोबा यांनी अनुमोदनही दिले. त्यानंतर गटविकास अधिकारी रविकांत आडसूळ यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखवला. याचवेळी संदीप राजोबा यांनी गेल्या उसाच्या एफआरपीबाबत करण्यात आलेल्या ठरावाचे काय झाले, असा सवाल करत मंचावर जात ध्वनिक्षेपक हातात घेतला. ही पंचायत समितीची आमसभा असून उसाच्या दराचा याठिकाणी संबंध नाही, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजोबा यांना सुनावले. त्यातून वादावादी सुरू झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत त्यावरून खडाजंगी सुरू झाली. त्यातूनच काहींनी राजोबा यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांना मंचावरून खाली ओढले आणि मारहाणीस सुरुवात केली. या झटापटीत राजोबा जमिनीवर पडले. काही कार्यकर्त्यांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. केवळ दोन मिनिटांत खुद्द पालकमंत्री कदम यांच्यासमोर घडलेल्या या प्रकाराने सारेच अवाक झाले. यावेळी कदम ध्वनिक्षेपकावरून कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करत होते.पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटकाव करत राजोबा यांना सभेबाहेर नेले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजोबा यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले. केवळ पाऊण तासात आमसभा आटोपती घेण्यात आली.मारहाणीची बातमी काही वेळातच पलूस-कडेगाव तालुक्यांत पसरली. दुपारनंतर राजोबा यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी पलूस शहर बंद केले. वसगडेसह इतर गावांतही बंद ठेवून घटनेचा निषेध केला. परिसरातील काही रस्त्यांवर पेटवलेले टायर टाकून वाहतूक रोखण्यात आली. (वार्ताहर)पतंगरावांच्या निवासस्थानावर दगडफेकसांगलीतील प्रकार : पोलिसांचा लाठीमार; पोलीसप्रमुखांच्या मोटारीपुढे कार्यकर्त्यांची लोळणसांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष व पलूस पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा यांना पलूसच्या आमसभेत मारहाण झाल्याचे पडसाद आज, शनिवार दुपारनंतर सांगलीत उमटले. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पतंगराव कदम यांच्या त्रिकोणी बागेसमोरील ‘अस्मिता’ निवासस्थानावर दगडफेक केली. घटनास्थळी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी भेट देऊन शांततेचे आवाहन केले. संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना सावंत चर्चेसाठी स्वत:च्या मोटारीतून नेत असताना खोत यांना अटक केल्याच्या संशयातून कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनसमोर सावंत यांची मोटार अडवून लोळण घेतली. यावेळी कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.मारहाणीत जखमी झालेल्या राजोबा यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना मारहाण झाल्याचे समजताच खोत यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली. राजोबा यांच्या छातीच्या डाव्या बाजूच्या तीन बरगड्या मोडल्या आहेत. त्यांना बोलताही येत नव्हते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच कार्यकर्ते संतापले. पालकमंत्री कदम त्यांच्या निवासस्थानी असल्याचे समजताच खोत यांच्यासह तीनशे ते चारशे कार्यकर्ते मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेले. पोलिसांनी निवासस्थानाबाहेर बॅरिकेटस् लावली होती. (पान ७ वर)