शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी वाळू ठेकेदारांची चांदी

By admin | Updated: July 14, 2014 00:34 IST

बेसुमार उपसा : वाळू ठेकेदारांना अवर्षणाचा बोनस, आठ ठेक्यांमधून महसूल विभागाला सात कोटींचे उत्पन्न

सदानंद औंधे : मिरज, दोन महिने पाऊस नसल्याने वाळू ठेकेदारांची चांदी झाली आहे. अवर्षणाचा इतरांना फटका बसला असला, तरी पावसामुळे मिळालेला बोनस वसूल करण्यासाठी नदीपात्रातून दिवस रात्र वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. मिरज परिसरात कृष्णाघाट, ढवळी, म्हैसाळ येथील आठ वाळू ठेक्यांपासून महसूल विभागाला सात कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तब्बल चार वर्षांनंतर यावर्षी वाळू उपसा ठेका देण्यात आल्याने दुप्पट महसूल वसूल झाला आहे. वाळू उपसा ठेक्याला एक महिना उशीर झाल्याची तक्रार करणाऱ्या वाळू ठेकेदारांना पावसाअभावी बोनस मिळाला आहे. वाळू ठेक्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असली, तरी जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली की दोन महिने वाळू उपसा व वाहतूक बंद होते. यावर्षीही जून महिन्यातील पाऊस अपेक्षित धरुन वाळू ठेकेदारांनी जूनपूर्वीच मोठ्या प्रमाणात उपसा करून वाळू साठे करून ठेवले आहेत. मात्र जून व जुलै महिन्यात पावसाचा पत्ता नसल्याने वाळू ठेकेदारांचा दुप्पट वेगाने वाळू उपसा सुरू आहे. संधीचा फायदा घेण्यासाठी वाळू ठेकेदारांत मोठी स्पर्धा असल्याने दिवस-रात्र वाळू उपसा सुरू आहे. ढवळीत वाळू चाळल्यानंतर शिल्लक राहणारी मोठी वाळू मोठ्या प्रमाणात नदीपात्रात टाकण्यात येत आहे. नदीपात्रात असणाऱ्या जॅकवेलशेजारी दोनशे फूट अंतरावर वाळू उपसा करण्यास मनाई असली, तरी बेधडक जॅकवेलशेजारी वाळू उपसा सुरू आहे. म्हैसाळ परिसरात वाळूचा एकच अधिकृत ठेका असला, तरी रात्रीच्यावेळी नदीपात्रात बोटी सोडून चोरटा वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.म्हैसाळ परिसरात कर्नाटक हद्दीलगत शेतात अवैध वाळू साठे करण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय पवार यांनी म्हैसाळात छापा टाकून अवैध वाळू साठा पकडला. मात्र त्यानंतरही वाळूचे चोरटे साठे केले असल्याच्या तक्रारी आहेत. ढवळीत ग्रामपंचायतीच्या हद्दीत वाळू उपसा कोण करावयाचा यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दोन गटांत हाणामारी झाली. त्यानंतर स्वत:च्या क्षेत्राबाहेर सामंजस्याने वाळू उपसा करण्याबाबत दोन्ही गटांत समझोता झाल्याची माहिती मिळाली. ढवळीत वाळू उपसा ठेक्यासाठी नदीकाठी जागा न मिळाल्याने नदीपात्रात भराव करून वाळू साठा करण्यात येत आहे. वाळू उपशाचा ठेका सुरू असलेल्या गावात मंदिरे, धार्मिक स्थळे, कमानी, रस्ते यासाठी ठेकेदार मोठ्या देणग्या देत आहेत.----तालुक्यात पथके नियुक्त करण्यात आली आहेत. रात्रीची गस्त घालण्यात येत आहे. परजिल्ह्यातून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे. वाळू चोरट्यांवर फौजदारी कारवाईच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. बेकायदा वाळू उपसा किंवा वाळू चोरी सुरू असल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. - विजय पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी----- पाऊस नसल्याने वाळू ठेकेदारांना बोनस मिळाला, हे चुकीचे आहे. पाऊस पडल्याने वाळूची टंचाई होते. मागणी वाढल्याने दर वाढतात व त्याचा आम्हाला फायदा होतो. शासनाचे सर्व नियम पाळून वाळू ठेका चालविणे सोपे नाही. रात्रीच्यावेळी वाळू उपसा करण्याबाबत आम्हाला सवलत मिळत नाही. वाळू ठेकेदारांना त्रासच जास्त असल्याने वाळू ठेका घेऊन आम्ही चूकच केली आहे. - वर्धमान अवधूत, वाळू ठेकेदार, ढवळी