शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराव भिडे यांच्याकडून कोरोना नियमाला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:38 IST

फोटो आहे... लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे बुधवारी एका कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ...

फोटो आहे...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे बुधवारी एका कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी आमदार अनिल बाबर यांना चक्क मास्क काढायला लावून कोरोना नियमांना ठेंगा दर्शविला. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात संभाजीराव भिडे यांच्या या कृतीची चर्चा रंगली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आरपीआयने केली आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना तोंडावरील मास्क काढायला लावला. आणि कोरोना होत नाही मास्क काढा असे सांगितले. यावेळी बाबर यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार मास्क काढून टाकला आणि फीत कापली. याबाबतचे चित्रीकरण सर्वत्र व्हायरल झाले. त्यानंतर या प्रकाराबाबत ऊलट-सुलट चर्चा रंगली आहे.

भिडे यांनी स्वतः मास्क न घालता आमदारांना मास्क काढण्याची सूचना दिली म्हणून त्यांच्यावर राज्य सरकारने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

चौकट

चौगुलेंवरही दाखल झाला होता गुन्हा

एकीकडे शिवप्रतिष्ठानमधून बाहेर पडलेले व वेगळी संघटना स्थापन केलेले नितीन चौगुले यांनी सांगलीत मेळावा घेतला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडेही कोरोना नियम मोडल्याप्रकरणी कारवाईच्या ''रडार''वर आहेत.