जत : चिंचणी (ता. तासगाव) येथील प्रतिष्ठा फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा समाजरत्न पुरस्कार उमदी (ता. जत) येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराव जाधव यांनी केली आहे. पुरस्काराचे वितरण दि. २५ सप्टेंबर रोजी पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, आमदार रोहित पवार, ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तासगाव येथे होणार आहे.
बिराजदार यांच्याकडे संघटन कौशल्य असल्याने विठ्ठलवाडी येथील युवक त्यांच्या पाठीशी आहेत. जळीतग्रस्त लोकांना तातडीने मदत करणे, युवकांना व्यसनमुक्तीपासून परावृत्त करणे, गोरगरीब लोकांंच्या औषधोपचारासाठी मदत करणे, कोरोनाकाळात अन्नधान्य व भाजीपाला मोफत देणे असे उपक्रम राबविल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.