शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

सांगलीत जिजाऊंना अभिवादन

By admin | Updated: January 12, 2017 23:59 IST

विविध कार्यक्रम : जिजाऊ ब्रिगेडच्या दशरात्रोत्सवाची उत्साहात सांगता

सांगली : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी त्यांना जिजाऊ ब्रिगेड व मराठा संस्थेतर्फे स्वतंत्र कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले. जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेडतर्फे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या जिजाऊ दशरात्र महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. मराठा समाज संस्थेतर्फे महिला विभागप्रमुख ज्योती चव्हाण व ज्येष्ठ संचालक बाळासाहेब सावंत यांच्याहस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. ज्योती चव्हाण यांनी राजामाता जिजाऊंच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सरचिटणीस सुधीर सावंत, खजिनदार ए. डी. पाटील, माजी अध्यक्ष रघुनाथराव पाटील, तानाजीराव मोरे, अ‍ॅड. उत्तमराव निकम, डॉ. मोहन पाटील, अ‍ॅड. विलास हिरुगडे-पवार, महिला विभागातील स्मिता पवार, सीमा पाटील, प्रतिभा निकम आदी उपस्थित होते.जिजाऊ ब्रिगेडच्या जिजाऊ दशरात्र महोत्सवाची गुरुवारी दहाव्यादिवशी सांगता करण्यात आली. आ. सुमनताई पाटील प्रमुख पाहुण्या, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील उपस्थित होत्या. पाहुण्यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष हेमलता देसाई यांनी स्वागत केले. सचिव विद्युलता मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. आ. सुमनताई पाटील म्हणाल्या, राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. आपल्या मनात तयार असलेली स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, चतुराई, संघटन आणि पराक्रम अशा विविध गुणांचे बाळकडू दिले. दोन वर्षापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या राजमाता जिजाऊंच्या स्मारकाच्या अडीचशे रुपये कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा केला जाईल. जयश्रीताई पाटील यांनी नवीन वर्षाचा संकल्प करताना आपल्या मनातील भावना व्यक्त करा; तरच आपण आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो, असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जिजाऊ सावित्री दशरात्र महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत रेखा दामुगडे यांनी प्रथम, संजोत माने यांनी द्वितीय, तर विद्युलता मोरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे.यावेळी शुभांगी देशमुख, वर्षा राऊत, रचना राऊत, सुप्रिया घार्गे, संजीवनी जाधव, सुजाता भगत, मंगला जवळेकर, विद्या मोरे, सविता माने, सविता निकम, विद्या भोसले, शीतल मोरे आदी उपस्थित होत्या. रूपाली राऊत व लता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा माने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)