शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा परिसरात क्षारपड जमीन पुन्हा लागवडीखाली

By admin | Updated: May 10, 2017 22:20 IST

चाळीस वर्षांनंतर बहर : जलयुक्त शिवारमधून चर काढली, लोकसहभागातून जेसीबी, शासनाचे डिझेल

लोकमत न्यूज नेटवर्क --आष्टा : आष्टा परिसरातील आष्टा, कारंदवाडी, मिरजवाडी, मर्दवाडीतील हजारो एकर जमीन अतिपाण्यामुळे क्षारपड झाली होती. माजी मंत्री आ. जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी याची पाहणी केली. जलयुक्त शिवार योजनेतून निचरा चरीसाठी लोकसहभागातून जेसीबी, तर शासनाकडून डिझेल देण्यात आले. हे काम पूर्ण झाल्याने हजारो एकर शेती बहरू लागली आहे. आष्टा परिसरात ऊस शेतीचे क्षेत्र वाढले. अहोरात्र पाणी सोडल्याने या जमिनी नापीक होऊ लागल्या, क्षारपड झाल्या. शेती असून पीक येत नसल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून चर काढण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली. लोकसहभागातून चर खुदाईसाठी जेसीबी व शासनाकडून त्यासाठी डिझेल खर्च देण्यात आले. मे २०१६ मध्ये क्षारपड जमिनीतून २० फूट रुंद व ६ फूट उंच चर खोदण्यात आली. ५१८० मीटर चर खोदण्यात आली. यासाठी जेसीबी ६९२ तास १८ मिनिटे सुरु होता. याकामी राजारामबापू साखर कारखान्याने सहकार्य केले.कारंदवाडी, मर्दवाडी परिसरातील चर खुदाई काम झाले आहे. क्षारयुक्त व जलयुक्त जमिनी पुन्हा शेती करण्यास उपयुक्त होत आहेत. ग्रामपंचायतीने माजी मंत्री आ. जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला आहे.- अभिजित पाटील, उपसरपंच, मर्दवाडी मर्दवाडी (ता. वाळवा) येथील कामाची पाहणी करताना माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत.