शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

फळविक्रीच्या नावाखाली दारूची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या कालावधीत फळविक्रीच्या नावाखाली दारूची विक्री करण्यात येत असल्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या कालावधीत फळविक्रीच्या नावाखाली दारूची विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला. निर्बंध कालावधीत फळ विक्रेत्यांना परवानगी असल्याने फळविक्रेत्याचे ओळखपत्र मिळवून संशयिताने विश्रामबाग परिसरात दारूविक्री सुरू केली होती. सदाशिव गौडाप्पा दुधाळ (रा. उत्तर शिवाजीनगर, सांगली) असे संशयिताचे नाव असून पोलीस आणि महापालिकेच्या पथकानेही ही कारवाई केली.

शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद आहेत. मात्र, फळे व भाजीपाला विक्रीस परवानगी आहे. नेमका याचाच फायदा घेत संशयिताने विश्रामबाग येथील चिनार हॉटेल परिसरात फळ विक्रीसाठी ओळखपत्र मिळवत देशी दारू विक्री सुरू केली होती. याबाबतची माहिती मिळताच पथकाने त्यास ताब्यात घेतले असता, त्याच्याजवळील पोत्यात २८ देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. विश्रामबाग पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून दुधाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.